एक्स्प्लोर
अक्षयच्या नव्या सिनेमाची शूटिंग सुरु, सेटवरील फोटो शेअर

नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या 'टॉयलेट-एक प्रेम कथा' या सिनेमाच्या शूटिंगला आज सुरुवात झाली आहे. सिनेमातील अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबतचा फोटो अक्षय कुमारने शेअर केला आहे. शूटिंगच्या सेटवरील फोटो शेअर करताना चाहत्यांच्या शुभेच्छा गरजेच्या असल्याचं अक्षयने म्हटलं आहे. 'टॉयलेट-एक प्रेम कथा' या टायटलची अनेक दिवसांपासून चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत अभियानावर या सिनेमाची कथा आधारीत आहे. https://twitter.com/akshaykumar/status/795142157225037824 सिनेमातील अभिनेत्री भूमी पेडणेकर यापूर्वी 'दिल लगा के हैशा' या सिनेमात दिसली होती. आता अक्षय कुमारसोबत पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























