Alia Bhatt Ranbir Kapoor : आलिया भट्ट-रणबीर कपूर आहेत कोट्यवधींचे मालक
Alia Bhatt : आलिया-रणबीरची एकूण संपत्ती 150 कोटींपेक्षा जास्त आहे.
Alia Bhatt Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) लग्नबंधनात अडकले आहेत. 14 एप्रिल 2022 रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नामुळे सध्या ते चर्चेत आहेत. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर कोट्यवधींचे मालक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आलिया-रणबीरची एकूण संपत्ती 150 कोटींपेक्षा जास्त आहे.
रणबीर कपूरने 'रॉकस्टार' आणि 'बर्फी' सारख्या सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रणबीरची गणना बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींमध्ये केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर एका सिनेमात काम करण्यासाठी 18-20 कोटी रुपये मानधन घेतो. जाहिरातींमधूनही तो खूप पैसे कमवतो. रिपोर्ट्सनुसार, रणबीरची एकूण संपत्ती 322 कोटी रुपये आहे.
View this post on Instagram
कमाईच्या बाबतीत आलिया भट्ट रणबीरपेक्षा थोडी मागे आहे. आलिया एका सिनेमासाठी 5 ते 8 कोटी रुपये मानधन घेते. तर एका जाहिरातीसाठी ती एक ते दोन कोटी रुपये मानधन घेते. त्यामुळे रणबीरची संपत्ती आलियापेक्षा जास्त आहे. आलिया-रणबीरची एकूण संपत्ती 150 कोटींपेक्षा जास्त आहे. तसेच त्यांच्याकडे आलिशान गाड्यादेखील आहेत.
संबंधित बातम्या