Alia Bhatt : आलियाने रणबीरला दिलं खास बर्थडे गिफ्ट; 'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी निवड
Alia Bhatt : आलिया भट्टची 'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी निवड झाली आहे.
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आलियासाठी 2022 हे वर्ष वैयक्तिक कारणांसह व्यावसायिकरित्यादेखील खास आहे. आलिया-रणबीरचा 'ब्रह्मास्त्र' सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत असून आज रणबीरच्या वाढदिवशी आलियाने पुन्हा एकदा चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी (Time 100 Impact Award) आलियाची निवड झाली आहे.
'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी आलियाची निवड झाली आहे. आलियाने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. सिनेक्षेत्रातील योगदानाबद्दल तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आलियाला हा पुरस्कार मिळाल्याने सोनी राजदानदेखील आनंदी झाल्या आहेत.
View this post on Instagram
आलियाच्या पतीचा म्हणजेच रणबीरचा आज वाढदिवस आहे. आलियाला आजच हा पुरस्कार जाहीर झाल्याने आलियाने चॉकलेट बॉय रणबीरला वाढदिवसाची चांगली भेट दिली आहे. आलियाने एका पेक्षा एक सिनेमांत काम करत प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी दिली आहे. 'गंगूबाई काठियावडी', 'आरआरआर', 'डार्लिंग्स', 'ब्रह्मास्त्र' अशा हिट सिनेमांत आलियाने काम केले आहे. त्यामुळेच तिची गणना बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटींमध्ये केली जाते.
2 ऑक्टोबरला होणार आलियाचा गौरव
'टाईम 100 इम्पॅक्ट पुरस्कारा'साठी आलियाची निवड झाली असल्याची घोषणा आज झाली आहे. तर 2 ऑक्टोबरला सिंगापुरमध्ये आलियाला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आलियाने सोशल मीडियावर पुरस्काराचं सन्मानपत्र शेअर केलं आहे. आलियाच्या या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
आलियाने शेअर केलेल्या सन्मानपत्रात लिहिलं आहे,"आलिया भट्टने तिच्या दमदार अभिनयामुळे आधुनिक स्त्रीची प्रतिमा मिळवली आहे.' आलियाच्या या यशाबद्दल कळल्यावर तिची आई सोनी राजदानलादेखील आनंद झाला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहते आलियाचे अभिनंदन करत आहेत.
संबंधित बातम्या