(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Guess Who: फोटोमधील 'या' क्यूट मुलीला ओळखलं? सध्या गाजवतीये बॉलिवूड, कपूर घराण्याशी आहे खास नातं
Guess Who: सोशल मीडियावर (Social media) स्टार्सचे बालपणीचे फोटो आणि व्हिडीओ देखील अनेकवेळा व्हायरल होतात.
Guess Who: सोशल मीडिया (Social media) हे असे प्लॅटफॉर्म आहे, ज्यावर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर स्टार्सचे बालपणीचे फोटो आणि व्हिडीओ देखील अनेकवेळा व्हायरल होतात. नुकताच एका बॉलिवूड स्टारचा बालपणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आलिया भट्टचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या बालपणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया ही महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्यासोबत खेळताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिनं पिंक फ्रॉक घातलेला दिसत आहे.
आलिया भट्ट ही प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांची मुलगी आहे. तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) 2022 मध्ये लग्न केले आहे. रणबीर आणि आलिया यांना राहा ही मुलगी आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
आलियाचा काही दिवसांपूर्वी रॉकी और रानी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यानंतर आता आलिया भट्ट तिच्या आगामी 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट 27 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटात कोणकोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
View this post on Instagram
आलियाचे चित्रपट
आलियाच्या डार्लिंग्स, हायवे, 2 स्टेट्स आणि हम्टी शर्मा की दुल्हनिया , गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तसेच आलियानं बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं.तिची हार्ट ऑफ स्टोन ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी रिलीज झाली. ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली. आलियाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Guess Who : बॉलिवूड नाही तर, हॉलिवूडवरही गाजवतेय राज्य! फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलंत का?