Brahmastra Advance Booking : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाकडून केवळ कलाकार आणि निर्मात्यांनाच नाही, तर बॉलिवूडलाही खूप आशा आहेत. अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरल्यानंतर सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या (Brahmastra) यशाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. या चित्रपटाच्या कलेक्शनवरही बॉलिवूडचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या निर्माते आणि स्टारकास्टकडून चित्रपटाचे मोठ्या प्रमाणावर प्रमोशन केले जात आहे. यातच आता या चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग (Brahmastra Advance Booking) देखील सुरु झाली आहे, ज्याचे आकडे नुकतेच समोर आले आहेत.


‘ब्रह्मास्त्र’च्या रिलीजला अद्याप चार दिवस बाकी असतानाही या चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. पीव्हीआर सिनेमाने या चित्रपटाच्या एक लाख तिकिटांची अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाल्याचे म्हटले आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा हा आकडा पाहता या चित्रपटाने ‘आरआरआर’ आणि ‘भूल भुलैया 2’ला देखील मागे टाकल्याचे म्हटले जात आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या आकड्यांनुसार हा चित्रपट आहात बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग करू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.



आलिया-रणबीरची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला...


‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट बनवण्यासाठी सुमारे 410 कोटींचे बजेट खर्च करण्यात आले आहे, त्यामुळे ओपनिंगसोबतच आगामी काळातही बॉक्स ऑफिसवर टिकून राहण्यासाठी हा चित्रपट खूप महत्त्वाचा ठरणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


पहिल्याच दिवस बॉक्स ऑफिस गाजवणार!


एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाने पहिल्याच दिवशी हिंदी बॉक्स ऑफिसवर सुमारे 19 कोटींची ओपनिंग केली होती. ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अर्थात चित्रपटाच्या रिलीजसाठी अजून चार दिवस बाकी आहेत आणि हे आकडे असेच पुढे गेले, तर अ‍ॅडव्हान्स बुकिंगसोबतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तब्बल 20 कोटींची दमदार ओपनिंग करू शकेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.


साऊथमध्येही चित्रपटाची चर्चा!


या चित्रपटात नागार्जुन आणि राजामौली यांची नावे देखील सामील असल्याने दक्षिणेतही चित्रपटाची जोरदार चर्चा रंगणार आहे आणि चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळणार आहे. उर्वरित राज्यांमध्ये अर्थात तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातही चित्रपट चांगला व्यवसाय करू शकतो. या चित्रपटात नागार्जुन मुख्य भूमिकेत नाही, त्यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये हा डब करून प्रदर्शित होणारा हिंदी चित्रपट मानला जाईल. तरीही रणबीरच्या स्टारडमचा आणि चित्रपटाच्या प्रमोशनचा याला फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: