Rohit Shetty Meet Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  (Amit Shah) हे मुंबई (Mumbai) दौऱ्यावर होते. यादरम्यान अमित शाह यांनी बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीची भेट घेतली. रोहित शेट्टीने (Rohit Shetty) इंस्टाग्रामवर अमित शहा यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमित शाह आणि रोहित शेट्टी हे चर्चा करताना दिसत आहेत. 


फोटो शेअर करताना रोहित शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी यांना भेटणे ही सन्मानाची गोष्ट आहे.' या पोस्टवर गायक राहुल वैद्यनेही कमेंट केली आहे. तसेच रोहितच्या चाहत्यांनी त्याच्या या पोस्टला लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत.


रोहितची पोस्ट: 






रोहितचे आगामी चित्रपट 
रोहित शेट्टी हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. रोहित हा त्याच्या अॅक्शन चित्रटांसाठी ओळखला जातो. सध्या रोहित हा 'खतरों के खिलाडी 12'  या रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन करत आहे. तसेच रोहित हा सर्कस, सत्ता पे सत्ता, सिंघम 3 या आगामी चित्रपटांचे दिग्दर्शन करत आहे. याशिवाय रोहित काही दिवसांपूर्वी त्याच्या  'इंडियन पोलिस फोर्स' या  आगामी वेब सीरिजचे शूटिंग करत होता. या वेब सीरिजमधून शिल्पा शेट्टी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे कलाकार ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. 


बिग बॉस 16 चं सूत्रसंचालन करणार? 
तसेच बिग बॉस 16 चं देखील सूत्रसंचालन रोहित करु शकतो, असं म्हटलं जात होतं. पण एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ही अफवा असून रोहितला  'बिग बॉस 16' ची ऑफर आली नाही. रोहितसच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Box Office Clash : बॉलिवूड सिनेमे पुन्हा येणार आमने-सामने; अनेक बिग बजेट चित्रपटांचा समावेश