Ranbir Kapoor Brahmastra New Song Deva Deva : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'केसरिया' (Kesariya) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याने अनेक रेकॉर्ड केले. आता या सिनेमातील 'देवा देवा' (Deva Deva) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

Continues below advertisement

'केसरिया' प्रमाणेच 'देवा देवा' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 'केसरिया'मध्ये रणबीरचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. तर 'देवा देवा' मध्ये रणबीर देवाच्या भक्तीत तल्लीन झालेला पाहायला मिळणार आहे. या गाण्यात रणबीर आगीसोबत खेळताना दिसत आहे. 

'देवा देवा' हे गाणं अरजीत सिंह आणि जोनिता गांधी यांनी गायले आहे. तर या गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहेत. तर प्रीतमने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याच्या शेवटी आलिया-रणबीरचा रोमॅंटिक अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर सध्या हे गाणं व्हायरल होत आहे. अरजीत सिंहच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना आवडत आहे. 

Continues below advertisement

9 सप्टेंबरला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबरला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. बॉलिवूड स्टार रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता नागार्जुन यांचाही या मल्टीस्टारर चित्रपटात समावेश आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि आलियाची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. अयान मुखर्जीने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

संबंधित बातम्या

Brahmastra : आलिया-रणबीरच्या 'केसरिया' गाण्याने केला रेकॉर्ड, लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Alia Bhatt : आलिया भट्टच्या डिलिव्हरी डेटची चर्चा, ‘या’ महिन्यात कपूर घराण्यात होणार चिमुकल्या पाहुण्याचं आगमन!