Brahmastra : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चित्रपटांना बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. सोशल मीडियावरील बायकॉट ट्रेंड सोशल मीडियावर सध्या बायकॉट हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. लाल सिंह चड्ढा आणि रक्षा बंधन या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकरी करत होते. तसेच ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटाला देखील बॉयकॉट करण्याची मागणी केली जात आहे. सध्या वी लव्ह आलिया भट्ट आणि  बॉयकॉय ब्रह्मास्त्र हे दोन हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. या ट्रेंडचा चित्रपटावर कसा परिणाम होईल? तसेच हे हॅशटॅग का ट्रेंड का होत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? जाणून घेऊयात त्याबद्दल... 


'वी लव्ह आलिया भट्ट हॅशटॅग होतोय ट्रेंड
सध्या सोशल मीडियावर वी लव्ह आलिया भट्टा हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. 'आलियानं गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटातील कामानं सर्वांनाच आश्चर्यचकित केलं', असं ट्वीट शेअर करुन एका नेटकऱ्यानं वी लव्ह आलिया भट्ट या हॅशटॅगचा वापर केला आहे. तर एक युझरनं ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आलिया ही केसरिया हे गाणं गाताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन युझरनं  'वी लव्ह आलिया भट्ट' हा हॅशटॅग वापरला आहे. त्यामुळे आलियाचे फॅन्स ब्रह्मास्त्र हा चित्रपट बघतील असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या ट्रेंडचा चित्रपटाला फायदा होईल, असं नेटकरी म्हणत आहेत. 


ब्रह्मास्त्रला का केलं जातंय बॉयकॉय?
एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील रणबीरचं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. "मला गोमांस खायला आवडतं", असं रणबीर या व्हिडीओमध्ये म्हणत आहे. त्यामुळे "आम्ही गोमांस खाणाऱ्या कलाकाराला प्रोत्साहन देत नाही", 'ब्रम्हास्त्र' सिनेमाला बॉयकॉट करा अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत". तसेच या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की रणबीर हा पळत येतो आणि मंदिराची घंटा वाजवतो. यामध्ये रणबीर हा चप्पल घालून मंदिराची घंटा वाजवताना दिसतोय. त्यामुळे आता अनेक नेटकरी या चित्रपटाला ट्रोल करत आहेत. तसेच त्यावेळी नेटकऱ्यांनी हा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली. 


चित्रपटावर कसा होऊ शकतो परिणाम?


'वी लव्ह आलिया भट्ट' हा हॅशटॅग ट्रेंड झाल्याचा या चित्रपटावर चांगला परिणाम होईल. कारण आलियाचे फॅन्स हा चित्रपट आवर्जुन बघतील. पण बॉयकॉट ब्रह्मास्त्र या ट्रेंडमुळे चित्रपटाला नुकसान होऊ शकतं असा अंदाज वर्तवला जात आहे. 


पाहा व्हायरल ट्वीट्स: