Box Office Clash : बॉक्स ऑफिसवर या वर्षात दाक्षिणात्य सिनेमांचा दबदबा पाहायला मिळत आहे. 'पुष्पा', 'आरआरआर', 'केजीएफ 2' या दाक्षिणात्य सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे मात्र बॉलिवूड सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडले. मागील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेले 'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षाबंधन' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. येत्या काही दिवसांत अनेक सिनेमे आमने-सामने येणार आहेत. त्यामुळे आता कोणता सिनेमा किती गल्ला जमवतो याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'विक्रम वेधा' आणि 'पोन्नियन सेलवर पार्ट-1'
'विक्रम वेधा' आणि 'पोन्नियन सेलवर पार्ट-1' हे दोन्ही सिनेमे 30 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सैफ अली खान आणि ऋतिक रोशन 'विक्रम वेधा' सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. तर 'पोन्नियन सेलवर पार्ट-1'मध्ये ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत आहे.
तेजस आणि मिस्टर अॅन्ड मिसेस माही
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचा 'तेजस' सिनेमा 5 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर राजकुमार राव आणि जान्हवी कपूरचा 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' हा सिनेमा 7 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रामसेतु आणि थॅंक गॉड
अक्षय कुमारचा 'रामसेतु' हा सिनेमा 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्राचा 'थॅंक गॉड' हा सिनेमा 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोन्ही सिनेमांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे.
फोन भूत आणि कुत्ते
कतरिना कैफ 'फोन भूत' या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रुपेरी पड्यावर कमबॅक करत आहे. हा सिनेमा 4 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर या सिनेमाची अर्जुन कपूरच्या कुत्ते या सिनेमासोबत टक्कर होणार आहे.
गणपत, सर्कस आणि मॅरी क्रिसमस
गणपत, सर्कस आणि मॅरी क्रिसमस हे तिन्ही बिग बजेट सिनेमे 23 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या तीन सिनेमांची टक्कर होणार आहे.
संबंधित बातम्या