एक्स्प्लोर
Advertisement

अक्षय कुमारचा आणखी एक दिलदारपणा !

मुंबई: संवेदनशील अभिनेता म्हणून ज्याची ओळख आहे, त्या अक्षय कुमारने आणखी एक लौकिकाला साजेसं काम केलं आहे.
निर्माता रवी श्रीवास्तव यांच्या किडनी प्रत्यार्पणासाठी अक्षय कुमार मदत करणार आहे. रवी श्रीवास्तव यांनीच अक्षय कुमारला पहिल्या सिनेमात संधी दिली होती.
श्रीवास्तव हे 1991 मध्ये आलेल्या 'द्वारपाल' या सिनेमाचे निर्माते होते. अक्षय कुमारचा हा पहिलाच सिनेमा होता. मात्र हा सिनेमा पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे अक्षयने 'सौगंध' या सिनेमाद्वारे करिअरची सुरुवात केली. सौगंधमध्ये अक्षयला भूमिका देण्यासाठी श्रीवास्तव यांनीच मदत केली होती.
श्रीवास्तव हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना किडनी ट्रान्सप्लांटसाठी मदतीची गरज आहे. त्याबाबतचा एक लेख ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना अक्षय म्हणाला, "हां सर, माझी टीम त्यांच्या संपर्कात आहे. त्यांच्याकडे लक्ष आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भविष्य
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
