एक्स्प्लोर

Twinkle Khanna BirthDay | 'असं' केलं अक्षय कुमारनं ट्विंकल खन्नाला बर्थ डे विश, शेअर केला फोटो

Twinkle Khanna BirthDay | बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं त्याची पत्नी ट्विंकल खन्नाला सोशल मीडियावर बर्थ डे विश केलंय. त्याने दोघांचा एक फोटो शेअर केला आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची पत्नी आणि सध्या लेखनाचं काम करत असलेली ट्विंकल खन्नाचा आज वाढदिवस आहे. ती आज 47 वर्षाची झालीय. यानिमित्तानं अक्षय कुमारनं तिला वेगळ्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं सोशल मीडियावर ट्विंकल सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते दोघेही सायकलिंग करायला बाहेर पडलेले आहेत आणि हसताना दिसत आहेत.

अक्षय कुमारने हा फोटो शेअर करत लिहलंय की, "जीवनातल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आणखी एक वर्ष, परंतु याचा मला आनंद आहे की जीवनातले सगळे निर्णय मला तुझ्या सोबतीनं घ्यायची संधी मिळाली." या फोटोत ट्विंकल बोट नेट स्वेटर आणि डेनिम आउटफिटमध्ये दिसत आहे तरअक्षय कुमारने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातल्याचं दिसतंय.

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा अक्षय कुमारने शेअर केलेल्या या फोटोवर त्याच्या आणि ट्विंकलच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आणि ट्विंकलला शुभेच्छा दिल्या आहेत. काही लोकांनी त्यांची ही जोडी बॉलिवूडची सर्वात सुंदर जोडी असल्याचं सांगितलं आहे. ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमारने 1999 साली प्रदर्शित झालेल्या 'इंटरनॅशनल खिलाडी' आणि 'जुल्मी' या चित्रपटात एकत्रित काम केलं आहे. या दरम्यान त्यांच्यात जवळीकता वाढली होती.

2001 साली विवाहबंधनात चित्रपट क्षेत्रात काही खास करिअर करु न शकलेल्या ट्विंकलने 2001 साली अक्षय कुमारशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आरव आणि नितारा अशी त्यांची नावं आहेत. 2009 साली 'पीपल' मॅगेझिनने ट्विंकल खन्नाला भारताची चौथी बेस्ट डेस्ड सेलिब्रिटीचा पुरस्कार दिला होता.

संबंधित बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
बॉलिवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सत्ते पे सत्ते चित्रपटात साकारली होती प्रमुख भूमिका
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
'पोलिसांनी रात्री अचानक गाडी थांबवली, कारण नसताना...'; मराठी अभिनेत्यानं सांगितला अनुभव, नेमकं काय घडलं?
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
AI वर बनवलेला पहिला मराठी चित्रपट; 'मन पिशाच्च' होणार रिलीज, तुंबाडच्या दिग्दर्शकाचा खास प्रयोग
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष
प्रसिद्ध अभिनेत्रीनं 3 वर्षांच्या संसाराला लावला ब्रेक; बिझनेसमनशी घेतला घटस्फोट, वहिनीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
200 रुपये द्या, सिलेंडर देतो; बीडमधील गॅसटंचाईत ग्राहकांकडून पैशांची लूट, एबीपी माझाचं स्टिंग ऑपरेशन
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
विश्वचषक ट्रॉफीसह गौतम गंभीर अन् सूर्या सिद्धिविनायक मंदिरात, कर्णधाराने उंदीरमामाच्या कानात काय मागितलं?
Iran : अमेरिकेनं रशियन तेलाची आयात नको यासाठी महिने घालवले, आता रशियाचं तेल घ्या म्हणून भारतासह जगाला विनवण्या, इराणच्या विदेश मंत्र्यांचं ट्रम्प यांच्या वर्मावर बोट
अमेरिका भारतासह जगाला रशियन तेल खरेदीसाठी विनवण्या करतेय, इराणच्या विदेश मंत्र्यांचा हल्लाबोल
Embed widget