Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभर आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनाचा नाट्य परिषदेने धसका घेतला असून 5 नोव्हेंबर रोजी सांगलीत होणारा अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढिचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. नाट्यसंमेलन स्वागताध्यपदी असणाऱ्या सुधीर गाडगीळ (Sudhir Gadgil) यांनी आंदोलनामुळे राजीनामा दिला आहे.


अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची रंगकर्मी आणि नाट्यरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून होणार होणार म्हणून ते गाजत आहे. पण आता हे नाट्यसंमेलन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. नाट्यसंमेलन स्वागताध्यपदी असणाऱ्या सुधीर गाडगाळ यांनी राजीनामा दिल्याने मुहूर्तमेढ लांबणीवर पडली आहे. 


अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन 5 नोव्हेंबरपासून नाट्यपंधरी असलेल्या सांगलीत होणार होतं. यानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगुंटीवर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार होते. तथापि, राज्यभर उसळलेल्या मराठा आंदोलनामुळे हे सर्व कार्यक्रम तूर्त लांबणीवर टाकण्याचा निर्णय मध्यवर्ती संयोजन समितीने घेतला आहे. 


मराठी रंगभूमीदिनी राज्यव्यापी 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन विभागीय स्तरावर होणार आहे. नाट्यपंढरीत नाट्यसंमेलनाची तयारी सुरू होती. विष्णुदास भावे गौरवपदक प्रदान समारंभ प्रतिवर्षी 5 नोव्हेंबरला होत असतो. मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर सुरू झाला. आंदोलनाची धग राज्यभर असल्याने संमेलनाचा प्रारंभ करणे उचित नसल्याची भूमिका संयोजकांनी मांडली. त्यानंतर अंतिम निर्णय झाला. 


सुधीर गाडगीळ यांचा राजीनामा


आमदार सुधीर गाडगीळ यांनी संमेलन स्वागताध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. सुधीर गाडगीळ म्हणाले की,"मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असेलल्या आंदोलनाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे. हा लढा यशस्वी करण्यासाठी प्रत्यनशील आहोत. अशा परिस्थितीत स्वागताध्यक्षपद भूषवणे योग्य वाटत नाही". 


अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे कोषाध्यक्ष गिरीश चितळे म्हणाले,"सांगलीमध्ये चार आणि पाच नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या  मुहूर्तमेढीचा कार्यक्रम अखेर स्थगित करण्यात आला आहे. नाट्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. मराठा आंदोलन सुरू असल्यामुळे राज्यभरातून या मूर्तमेढीसाठी कलाकार व मान्यवर सांगलीत येणार आहेत मात्र त्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने मूर्तमेढीचा हा नियोजित कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. याबाबत मध्यवर्ती कार्यालयाला कळविण्यात आले असून मराठा आंदोलन शांत झाल्यानंतर पुढील तारीख जाहीर केली जाईल असं सांगली कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे".


संबंधित बातम्या


कोरोनाच्या कात्रीत 100 वे नाट्यसंमेलन !