Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज वाढदिवस आहे. शाहरुख आज आपला 58 वा वाढदिवस (Shah Rukh Khan Birthday) साजरा करत आहे. किंग खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी त्याच्या मन्नत (Mannat) बंगल्याबाहेर मोठी गर्दी केली होती. अभिनेत्याने (SRK) या सर्व चाहत्यांचे आभार मानले. मन्नतबाहेर शाहरुखच्या चाहत्यांनी जास्त गर्दी केल्याने पोलिसांना नियंत्रण मिळवण्यासाठी लाठी चार्ज करावा लागला. 


एसआरके  (SRK) अर्थात शाहरुख खान हा फक्त बॉलिवूड अभिनेता नसून जगभरात त्याचा बोलबाला आहे. जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेहमीप्रमाणे यंदाही चाहत्यांनी मन्नतबाहेर मोठी गर्दी केली होती. मन्नत बंगल्याच्या गॅलरीमधले शाहरुखचे आणि  बंगल्याबाहेरील चाहत्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुखने सर्व चाहत्यांना अभिवादन केलं. तसेच त्याच्या आयकॉनिक पोझने तर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. 






शाहरुखने ट्वीट करत मानले चाहत्यांचे आभार (Shah Rukh Khan Tweet)


शाहरुख खानला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यामुळे त्याने ट्वीट करत या सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने ट्वीट केलं आहे की,"तुमच्यापैकी अनेक मंडळी दरवर्षी रात्री उशिरा येऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात हे अविश्वसनीय आहे. मी फक्त एक अभिनेता आहे. तुमचं मनोरंजन करताना मला खूप आनंद मिळतो. खरंतर तुमच्या या प्रेमाच्या स्वप्नात मी जगतो. मला तुमचं मनोरंजन करण्याची परवानगी दिली त्याबद्दल आभार. सकाळी भेटू ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन". शाहरुखच्या या ट्वीटनंतर आता त्याच्या आगामी 'डंकी' (Dunky) या सिनेमाचा टीझर येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.






शाहरुखचा यंदाचा वाढदिवस खास (Shah Rukh Khan Birthday Celebration)


शाहरुखसाठी यंदाचा वाढदिवस खूपच खास आहे. त्याचे 'जवान' (Jawan) आणि 'पठाण' (Pathaan) हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, जवान आणि पठाणच्या यशाचं सेलिब्रेशन शाहरुख खान आज करणार आहे. शाहरुखच्या ग्रँड बर्थडे पार्टीत करण जोहर, आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, राजकुमार हिरानी, एटली हे सेलिब्रिटी हजेरी लावणार आहे. तसेच भाईजान सलमान खानदेखील (Salman Khan) उपस्थित असेल. 


संबंधित बातम्या


Shah Rukh Khan: खऱ्या आयुष्याच्या संघर्षातही शाहरुखच 'बाजीगर'; एका चित्रपटासाठी कोट्यवधी घेणाऱ्या किंग खानची पहिली कमाई माहितीये?