Shah Rukh Khan: "हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं" असं म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) आज 58 वा वाढदिवस आहे. शाहरुख हा कधी खलनायक होऊन प्रेक्षकांच्या भेटीस आला तर त्यानं कधी चॉकलेट बॉय होऊन प्रेक्षकांचे मनोरंजन केले. शाहरुखचा चित्रपटामधील प्रत्येक अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. सध्या एका चित्रपटात काम करण्यासाठी कोट्यवधींचे मानधन घेण्याऱ्या शाहरुखची पहिली कमाई किती होती? याबाबत जाणून घेऊयात...


किंग खानची पहिली कमाई


शाहरुखनं 'सर्कस' आणि 'फौजी'  या छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम केलं .त्यानंतर 1992 मध्ये त्याचा पहिला चित्रपट 'दीवाना' रिलीज झाला.  आज एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणाऱ्या शाहरुख खानची पहिली फी 50 रुपये होती. एका रिपोर्टनुसार, चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी शाहरुख खानने पंकज उधासच्या संगीत शोमध्ये हेल्पर म्हणून काम केले होते. या कामाचा त्याला पहिला पगार म्हणून  50 रुपये मिळाले. 


बॅक टू बॅक हिट चित्रपट


शाहरुख खानच्या 'दीवाना' या चित्रपटाव्यतिरिक्त 'चमटकर', 'राजू बन गया जेंटलमन' आणि 'दिल आशना है' सारखे चित्रपट 1992 मध्ये रिलीज झाले होते. या चित्रपटानंतर शाहरुखला हळूहळू लोकप्रियता मिळू लागली.शाहरुख खानचा 1993 मध्ये  'बाजीगर'  चित्रपट रिलीज झाला, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, शाहरुखचा 'बाजीगर' या चित्रपटाची निर्मिती 2 कोटींच्या बजेटमध्ये झाली होती.






'डर' या चित्रपटात शाहरुखनं साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली.   करण अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, यस बॉस, दिल तो पागल है, मोहब्बतें, कभी खुशी कभी गम, देवदास, डॉन, चक दे इंडिया यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये शाहरुखनं काम केलं.


फिनिक्स पक्षाप्रमाणे घेतली भरारी


 2016 मध्ये शाहरुख खानचा 'फॅन' चित्रपट रिलीज झाला होता. हा सिनेमा फ्लॉप ठरला. किंग खानचे 'रईस' आणि 'डियर जिंदगी' हे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सेमी हिट ठरले.  त्यानंतर 2018 मध्ये शाहरुखचा झिरो चित्रपट रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. पण शाहरुखनं हार मानली नाही. शाहरुखनं रुपेरी पडद्यावर दमदार पुनरागमन केलं.  शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तसेच सप्टेंबर महिन्यात रिलीज झालेल्या शाहरुखच्या जवान या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. 


शाहरुखचा आगामी चित्रपट


शाहरुखच्या डंकी या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.  22  डिसेंबर  2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. डंकी या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या:


Shah Rukh Khan: "नर्मदाची कथा अप्रतिम पण दुर्दैवाने..." ; नयनताराच्या 'जवान' मधील स्क्रिन टाईमबाबत काय म्हणाला शाहरुख?