एक्स्प्लोर
फोटो काढताना फोटोग्राफर्सचा गोंधळ, ऐश्वर्या संतापली
ऐश्वर्याचे फोटो काढण्यासाठी माध्यमांच्या फोटोग्राफर्सनी गोंधळ केला. त्यामुळे ऐश्वर्याच्या संयमाचा बांध फुटला आणि तिने फोटोग्राफर्सना चांगलंच फैलावर घेतलं.
मुंबई : फोटोग्राफर्स आणि पत्रकारांच्या आताताईपणामुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच वैतागली. ऐश्वर्या राय, आई वृंदा आणि छोट्या आराध्यासोबत वडिलांच्या जन्मदिनानिमित्त स्माईल्स ट्रेन फाऊंडेशच्या सुश्रुषा रुग्णालयामध्ये पोहोचली.
यावेळी तिने 100 मुलांच्या सर्जरीचा खर्च उचलणार असल्याची घोषणा केली. त्यावेळी ऐश्वर्याचे फोटो काढण्यासाठी माध्यमांच्या फोटोग्राफर्सनी गोंधळ केला. त्यामुळे ऐश्वर्याच्या संयमाचा बांध फुटला आणि तिने फोटोग्राफर्सना चांगलंच फैलावर घेतलं.
हा चित्रपटाचा प्रिमियर नाही, हे एक रुग्णालय आहे. इथे लहान मुलं आहेत. तुम्ही काहीतरी रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे, असं ऐश्वर्याने पत्रकारांना सुनावलं. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा हा पहिलाच जन्मदिन होता.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement