एक्स्प्लोर

Aishwarya : ऐश्वर्या प्रेग्नंट नाही! पोस्ट शेअर करत स्पष्टच म्हणाली,"मी तिसऱ्यांदा ओरडून सांगतेय..."

Aishwarya : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या प्रेग्नंट असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. एका कार्यक्रमादरम्यान अभिनेत्री चक्कर येऊन पडली होती. त्यानंतर पोस्ट शेअर करत तिने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

Aishwarya Pregnant : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आणि 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) फेम अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात चक्कर येऊन पडली होती. त्यानंतर ऐश्वर्या (Aishwarya Pregnant) प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. ऐश्वर्या गुड न्यूज देणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण आता ऐश्वर्याने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. एक पोस्ट शेअर करत ऐश्वर्याने चाहत्यांना प्रेग्नंट नसल्याचं सांगितलं आहे. तसेच प्रेग्नंसीच्या अफवा पसरवणाऱ्या नेटकऱ्यांची तिने शाळा घेतली आहे. तिसऱ्यांदा ओरडून सांगतेय मी प्रेग्नंट नाही, असं म्हणत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

प्रेग्नंसीच्या अफवांवर ऐश्वर्याने सोडलं मौन (Aishwarya Sharma Breaks Silence on Pregnancy Rumours)

प्रेग्नंसीच्या अफवा पसरल्याने ऐश्वर्या शर्माने एक पोस्ट शेअर करत या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे. ऐश्वर्याने लिहिलं आहे," तिसऱ्यांदा ओरडून सांगत आहे की मी प्रेग्नंट नाही. सतत येणाऱ्या मेसेजचा आता मला त्रास होत आहे. अफवा पसरवणं बंद करा. मी एक व्यक्ती आहे. बऱ्याचदा माझं बीपी कमी होतं. मी चक्कर येऊन बेशुद्ध झाले तेव्हा माझं ब्लड प्रेशर 60-80 होतं. त्यामुळे मी सेटवरच चक्कर येऊन पडली होती. पुन्हा सांगते मी प्रेग्नंट नाही". 

Aishwarya : ऐश्वर्या प्रेग्नंट नाही! पोस्ट शेअर करत स्पष्टच म्हणाली,

ऐश्वर्या शर्मा काही दिवसांपूर्वी एका होळी स्पेशल इव्हेंटच्या तालमीदरम्यान चक्कर येऊन पडली होती. त्यानंतर लगेचच तिला मेडिकल ट्रीटमेंटसाठी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर काही काळ आराम केल्यानंतर ऐश्वर्याने राहिलेलं शूटिंग पूर्ण केलं. 

ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट (Neil Bhatt) नोव्हेंबर 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले होते. 'गुम है किसी के प्यार में' (Gum Hai Kisi Ke Pyar Mein) या मालिकेत ऐश्वर्या आणि नील भट्ट मुख्य भूमिकेत होते. या मालिकेच्या सेटवर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी संसार थाटण्याचा निर्णय घेतला. विराट आणि पाखीची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट यांची ऑफस्क्रीन जोडीदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेतील कथानकामुळे त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे.

पत्नीची परवानगी घेऊन केला किसिंग सीन

शुद्धीवर आल्यानंतर ऐश्वर्याने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे रवी दुबे आणि सरगुन मेहता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. एका मुलाखतीत सरगुन म्हणाला,"जमाई राजा'साठी किसिंग सीन देण्याआधी रवी दुबेने सगळ्यात आधी माझी परवानगी घेतली. तसेच माझ्या आई-वडिलांनादेखील विचारलं. त्यानंतर निया शर्मासोबत किसिंग सीन शूट केला.

संबंधित बातम्या

Aishwarya Pregnant : ऐश्वर्या प्रेग्नंट? लवकरच चाहत्यांना देणार गुड न्यूज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget