एक्स्प्लोर
लग्नानंतर रणवीर राहणार दीपिकाच्या घरी
मुंबई: सिनेक्षेत्रातील हॉट कपल मानले जाणारे रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मात्र लग्नानंतर दीपिका रणवीरच्या घरी जाणार नसून रणवीर दीपिकाच्या घरी शिफ्ट होणार असल्याची माहिती आहे.
रणवीर - दीपिकाच्या निकटवर्तीयाकडून मिळालेल्या माहितीवरुन लग्नानंतर रणवीर सिंह आपल घर सोडून दीपिकाच्या घरी जाऊन राहणार आहे, असे डीएनएने आपल्या वृतात म्हटले आहे.
रणवीर आणि दीपिका मागील काही दिवसांपासून आपले ड्रीमहोम शोधत आहेत. परंतु त्यांना अजून आपल्या पसंतीचे घर मिळाले नाही. यामुळे रणवीर दीपिकासोबत शिफ्ट होईल असा निर्णय दोघांनी घेतला आहे.
रणवीर सध्या आपल्या कुटुंबीयांसोबत राहतो, तर दीपिका एकटीच राहते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. शिवाय दीपिकाने घर सोडू नये कारण दीपिकाने तिच्या अनेक वर्षाच्या कमाईतून घर घेतले आहे, असे रणवीरच मत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement