एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेत्री शमिता शेट्टीला ठाण्यात बाईकस्वारांची शिवीगाळ
शमिता शेट्टी कारने जात असताना ठाण्यातील विवियाना मॉलजवळ एका बाईकने तिच्या कारला धडक दिली. कारचं झालेलं नुकसान पाहण्यासाठी शमिताचा ड्रायव्हर दर्शन सावंत खाली उतरला. त्यावेळी बाईकवरील तिघांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोपही शमिताने केला आहे.
मुंबई : 'रोड रेज' म्हणजेच रस्ते वाहतुकीत हिंसक वागणुकीला अनेक वाहनचालकांना सामोरं जावं लागतं. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टीही ठाण्यात बाईकस्वारांच्या शिवीगाळाला बळी पडली. शमिताच्या कारला बाईकची धडक बसल्यानंतर भर दुपारी हा प्रकार घडला.
शमिता शेट्टी कारने जात असताना ठाण्यातील विवियाना मॉलजवळ एका बाईकने तिच्या कारला धडक दिली. कारचं झालेलं नुकसान पाहण्यासाठी शमिताचा ड्रायव्हर दर्शन सावंत खाली उतरला. त्यावेळी बाईकवरील तिघे जण आणि ड्रायव्हर यांच्यात शाब्दिक खटके उडाले. तिघांनी आपल्याला शिवीगाळ केल्याचा आरोपही शमिताने केला आहे.
ठाण्यातील गजबजलेल्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. शमिताने ठाण्यातील राबोडी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
बाईकस्वारांनी धमकावल्याचा आरोपही शमिताच्या चालकाने केला आहे. शमिताच्या चालकाने बाईकच्या नंबर पोलिसांना सांगितला असून अज्ञात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शमिता शेट्टी ही अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण. तिने मोहब्बते चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने झहर, फरेब, कॅश अशा काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement