एक्स्प्लोर
अभिनेत्रीच्या पतीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सासऱ्यांचं नाव
मुंबई : सुप्रसिद्ध दाक्षिणात्य टीव्ही अभिनेत्री मैना नंदिनीच्या पतीने आत्महत्या केली आहे. नंदिनीचे पती कार्तिकेयन यांनी चेन्नईतील एका लॉजमध्ये आत्महत्या केली असून सुसाईड नोटमध्ये सासऱ्यांचा उल्लेख केला आहे.
शीतपेयात विष मिसळून कार्तिकेयन यांनी मंगळवारी जीव दिला. चेन्नईतल्या विरुगंबक्कम परिसरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केली. बराच वेळ कार्तिकेयन रुममधून बाहेर न आल्याने लॉजमधील कर्मचाऱ्याने त्यांच्या रुममध्ये डोकावून पाहिलं असता, ते मृतावस्थेत आढळले.
कार्तिकेयन एका जीमचे मालक आहेत. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी सासऱ्यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच नंदिनी आणि कार्तिकेयन यांचा विवाह झाला होता. कार्तिकेयन यांचं हे दुसरं लग्न होतं. नंदिनी आणि कार्तिकेयन यांचं एकमेकांशी पटत नसल्याने काही दिवसांपासून ती माहेरीच राहत होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement