एक्स्प्लोर
बॉयफ्रेण्डच्या प्रपोजलचा फोटो अभिनेत्री अंकिता लोखंडेकडून शेअर
मुंबईतील बिजनेसमन विकी जैन आणि अंकिता लोखंडे काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. अंकिताने शेअर केलेल्या फोटोमध्ये विकी तिला गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसत आहे.
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने आपल्या रिलेशनशीपवर शिक्कामोर्तब केलं आहे. बॉयफ्रेण्ड विकी जैन गुडघ्यावर बसून प्रपोज करतानाचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
'पवित्रा रिश्ता' मालिकेमुळे मराठमोळ्या अंकिता लोखंडेचा चेहरा घराघरात लोकप्रिय झाला होता. मणिकर्णिका चित्रपटातून अंकिताने बॉलिवूडमध्येही पाऊल ठेवलं. गेल्या काही महिन्यांपासून अंकिताच्या लव्ह लाईफची चर्चा रंगत होती, मात्र तिने याला अधिकृत दुजोरा दिला नव्हता.
मुंबईतील बिजनेसमन विकी जैन आणि अंकिता काही काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरायचे, मात्र अंकिताने इन्स्टाग्रामवर विकीने प्रपोज करतानाचा फोटो शेअर करुन या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
फोटो शेअर करताना 'याबाबत विचार करेन' असं कॅप्शन अंकिताने दिलं आहे. अर्थात, तिने हे गमतीत म्हटलं असून तिच्या चेहऱ्यावरुनच तिचा होकार समजतो. विकी मूळ छत्तीसगडमधील विलासपूरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
अभिनेता सुशांत राजपूतसोबत अंकिता काही वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. मात्र दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नव्या नात्याबाबत वाच्यता करणं अंकिता सुरुवातीपासूनच टाळलं होतं.View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement