एक्स्प्लोर
Advertisement
Vidyut Jammwal | हातात अंडं धरुन विटा फोडल्या, विद्युत जामवालचा अनोखा स्टंट वायरल
हातात अंडं धरुन अभिनेता विद्युत जामवालने विटांवर वार केला, विटांचा चक्काचूर झाला, मात्र अंड्याला साधा धक्काही लागला नाही. विद्युतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे
मुंबई : सोशल मीडियावर नेहमीच एखादा ट्रेण्ड सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. सेलिब्रिटींपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेक जण ट्रेण्डमध्ये सहभागी होत असतात. बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. हातात अंडं धरुन विद्युतने विटांवर वार केला, मात्र विटा फुटल्या, तरी अंडं फुटलं नाही.
'पाचव्या जॅकी चॅन आंतरराष्ट्रीय चित्रपट सप्ताहाला हजेरी लावत आहे. जॅकी चॅन आणि त्यांच्या चाहत्यांना मी हे समर्पित करतो.' असं कॅप्शन विद्युतने दिलं आहे. अंडं धरुन विद्युतने विटांवर हात मारला, त्यामुळे विटांचा चक्काचूर झाला, मात्र अंड्याला साधा धक्काही लागला नाही, असं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
अवघ्या एका दिवसातच विद्युतच्या व्हिडिओला साडेबारा लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. विद्युतच्या या अनोख्या कौशल्याचं चाहत्यांनी भरभरुन कौतुकही केलं आहे.
विद्युत जामवाल नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतो. इन्स्टाग्रामवर त्याने वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. फिटनेस व्हिडिओच्या माध्यमातून तो नेहमीच आपल्या फॅन्ससमोर नवनवी आव्हानं ठेवत असतो.
विद्युत जामवालने नुकतंच अभिनेत्री पूजा सावंतसोबत 'जंगली' चित्रपटात काम केलं होतं. यापूर्वी त्याची भूमिका असलेले कमांडोचे दोन भाग, फोर्स, बादशाहो चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. विद्युत मूळ जम्मूचा असून तो अभिनयासह मार्शल आर्टिस्ट आणि स्टंट परफॉर्मरही आहे. बॉलिवूडसोबतच टॉलिवूड आणि कॉलिवूडमध्येही त्याने काम केलं आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
रत्नागिरी
पुणे
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion