Suraj Pawar : सैराट फेम अभिनेता सुरज पवार चौकशीसाठी राहुरीत हजर; आर्थिक फसवणूक प्रकरणी सहा तास कसून चौकशी
सोमवारी (26 सप्टेंबर) सुरजला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
Suraj Pawar : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील फसवणुक प्रकरणामुळे सध्या सैराट फेम अभिनेता सुरज पवार (Suraj Pawar) चर्चेत आहे. या प्रकरणामुळे पोलीस सध्या सुरज पवारची चौकशी करत आहेत. मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे आमीष दाखवून पैशांची लूट केल्या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यात 15 सप्टेंबर रोजी सुरज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणी चौकशीसाठी सुरज राहुरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाला.
सुरजची सहा तास कसून चौकशी
मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे सांगून तरुणाला फसवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी गजाआड केल्यानांतर यामागे मोठे रॅकेट असल्याचे निष्पन झाले आहे. या प्रकरणात सुरज पवार याचा सहभाग असल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिल्याने खळबळ उडाली. या प्रकरणात सुरज पवारचाही सहभाग आहे, असा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेतलं आहे. काल (23 सप्टेंबर) पोलिसांनी या प्रकरणी सुरजची सहा तास कसून चौकशी केली. सोमवारी (26 सप्टेंबर) सुरजला पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. चौकशीनंतर गुन्हात सहभाग आढळ्यास सुरज पवारला अटक होणार आहे.
काय आहे प्रकरण?
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील महेश बाळकृष्ण वाघडकर यांना एक फोन आला. 'आमच्या विभागात कोरोनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या सहायक कक्षाधिकारी म्हणून जागा खाली असून त्या भरायच्या आहेत. तेथे तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला पाच लाख रुपये द्यावे लागतील. काम होण्यापूर्वी दोन लाख आणि जेव्हा तुमच्या हातात ऑर्डर मिळेल त्यावेळी तीन लाख रुपये द्या' असं सांगितलं फोनवरून महेश यांना सांगण्यात आलं. बेरोजगार असल्यानं वाघडकर यांनी पैसे देण्यास सहमती दर्शविली. ठरल्याप्रमाणे 4 सप्टेंबर रोजी राहुरी बस स्थानकावर दोघांमध्ये तोंडी करार झाला आणि पहिल्या टप्प्यात त्याने आरोपीस दोन लाख रुपये दिले. तर उरलेली तीन लाख रूपयांची रक्कम ही नियुक्तीपत्र आल्यानंतर देण्याचे ठरले होते. दरम्यान दोन दोन दिवसानंतर तुमचे नियुक्तीपत्र हे राहुरी विद्यापीठ येथे घेऊन येऊ असे सांगितले. त्यानुसार 9 सप्टेंबर रोजी या सर्वांची भेट झाली. परंतु, वाघडकर याना संशय आला. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :