एक्स्प्लोर
Advertisement
अभिनेता श्रेयस तळपदे बाबा झाला
श्रेयस आणि दीप्ती यांच्या मुलीचा जन्म 4 मे रोजी सरोगसीच्या माध्यमातून झाला.
मुंबई : बॉलिवूडमध्ये मराठीचा झेंडा फडकवणारा अभिनेता श्रेयस तळपदेला गुड न्यूज मिळाली आहे. श्रेयस तळपदेच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. सरोगसीच्या माध्यमातून श्रेयस बाबा झाला.
श्रेयस आणि दीप्ती यांच्या मुलीचा जन्म 4 मे रोजी झाला. सरोगसीच्या माध्यमातून तळपदे दाम्पत्याला पालकत्व मिळालं. 14 वर्षांपूर्वी श्रेयस आणि दीप्ती विवाहबंधनात अडकले होते.
गेल्याच आठवड्यात श्रेयस आणि दीप्ती हाँगकाँगला सुट्टीसाठी गेले होते. 10 ते 20 मे दरम्यान बाळाचा जन्म होईल, अशी डेट डॉक्टरांनी दिल्यामुळे तळपदे परदेशी गेले होते.
सरोगेट मदरला अचानक प्रसुतिकळा सुरु झाल्याचं समजताच दोघं मुंबईला येण्यास निघाले. विमान प्रवासात असतानाच बाळाचा जन्म झाल्याची गोड बातमी त्यांना समजली.
बाळाचं नाव काय ठेवायचं, याबाबत श्रेयस विचार करत आहे. सरोगसीच्या माध्यमातून पालक होणं, हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय असल्याचं श्रेयस सांगतो.
यापूर्वी शाहरुख खान, आमीर खान, तुषार कपूर, करण जोहर, सनी लिओन यासारखे सेलिब्रेटी सरोगसीद्वारे पालक झाले आहेत. यापैकी तुषार आणि करण हे सिंगल पेरेंट्स आहेत.
श्रेयसने आभाळमाया मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. त्याची भूमिका असलेल्या दामिनी, अवंतिका सारख्या मालिका, तर पछाडलेला, सावरखेड एक गाव, आईशप्पथ यासारखे अनेक मराठी चित्रपट गाजले आहेत.
नागेश कुकूनूरच्या इक्बाल चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर डोर, अपना सपना मनी मनी, ओम शांती ओम, गोलमाल सीरिजमधील सिनेमात तो झळकला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement