Robbie Coltrane Death: ‘हॅरी पॉटर’च्या जादुई विश्वातील तारा निखळला! ‘हॅग्रिड’ फेम अभिनेते रॉबी कोलट्रन यांचे निधन
Robbie Coltrane Death: हॉलिवूड चित्रपट सीरिज 'हॅरी पॉटर'मध्ये (Harry Potter) हॅग्रिडची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते रॉबी कोलट्रन (Robbie Coltrane) यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले.
Robbie Coltrane Death: हॉलिवूड चित्रपट सीरिज 'हॅरी पॉटर'मध्ये (Harry Potter) हॅग्रिडची (Hagrid) भूमिका साकारणारे प्रसिद्ध स्कॉटिश अभिनेते रॉबी कोलट्रन (Robbie Coltrane) यांचे वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'हॅरी पॉटर' व्यतिरिक्त, ते ITV चा सस्पेन्स शो 'क्रॅकर' आणि जेम्स बाँड चित्रपट 'गोल्डनी' आणि 'द वर्ल्ड इज नॉट इनफ' मध्ये देखील झळकले होते.
रॉबी यांना ‘हॅरी पॉटर’ सीरिजमधील ‘रुबियस हॅग्रिड’ या पात्रामुळेच खरी ओळख मिळाली होती. त्यांना याच नावाने ओळखले जात होते. त्यांनी साकारलेली हॅग्रिडची व्यक्तिरेखा लोकांच्या नेहमी लक्षात राहील. हॅरी पॉटरशिवाय रॉबी अनेक चित्रपटांमध्ये झळकले होते. ते विशेषतः त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जात होते. रॉबी हा एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच उत्कृष्ट लेखक देखील होते. रॉबी कोलट्रन यांच्या निधनाची दु;खद बातमी त्यांच्या एजन्सीने चाहत्यांना दिली आहे. त्यांच्या जाण्याने अवघ्या मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
हॅग्रिडच्या भूमिकेमुळे कायम राहतील स्मरणात!
रॉबी यांच्या एजन्सीने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, ‘रॉबी एक उत्कृष्ट अभिनेते होते. सलग तीन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार जिंकल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांचे नाव नोंदवले गेले होते. हॅरी पॉटर चित्रपटातील हॅग्रिडच्या भूमिकेमुळे येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत तो प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या लक्षात राहतील. जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी ही भूमिका होती.’
रॉबी कोलट्रन यांची ओळख
रॉबी कोलट्रन यांचा जन्म 30 मार्च 1950 रोजी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झाला होता. त्यांचे खरे नाव अँथनी रॉबर्ट मॅकमिलन होते. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा रॉबी यांनी अभिनयविश्वात नशीब आजमवायचे ठरवले, तेव्हा त्यांना खूप संघर्ष करावा लागला होता. सुरुवातील इंडस्ट्रीत अपयश आल्यानंतर रॉबी यांनी एक क्लबमध्ये स्टँड-अप कॉमेडी करायला देखील सुरुवात केली होती.
‘हॅरी पॉटर’ या चित्रपट सीरिजमध्ये त्यांनी साकारलेले हॅग्रिड हे पात्र मुख्य पात्रांपैकी एक होते. त्यांनी साकारलेला ‘रुबियस हॅग्रिड’च हॅरीला हॉगवर्ट्समध्ये घेऊन जात होता. हॅग्रिड या व्यक्तिरेखेमुळे त्यांना घरोघरी ओळख मिळाली. या चित्रपटातील शरीराने भव्यदिव्य दिसणारा हॅग्रिड छोट्या-छोट्या गोष्टींवरून भावूक व्हायचा. लहान मुलांची विशेषतः हॅरीची काळजी घेणारा हॅग्रिड बच्चे कंपनीमध्येही लोकप्रिय होता. या भूमिकेतील कॉमिक टायमिंगने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘हॅरी पॉटर’शिवाय रॉबी अनेक चित्रपटांमध्ये झळकले होते. चित्रपटांनंतर रॉबी टीव्ही क्षेत्राकडे वळले होते. त्यांनी चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही मालिकांमध्येही काम केले होते.
हेही वाचा :