67 व्या वाढदिवसाला Anupam Kher यांची खास पोस्ट, फिट बॉडी पाहून चाहते आश्चर्यचकित!
अनुपम खेर यांनी आपल्या 67 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. अनुपम खेर यांनी आपल्या फिटनेसचा फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर आज आपला 67वा वाढदिवस साजरा करत आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत विशेष स्थान निर्माण करणारे अनुपम खेर फिटनेसच्या बाबतीतही सध्याच्या अभिनेत्यांचा टक्कर देत आहेत. अनुपम खेर यांच्या अभिनयाचा डंका बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्ये वाजतो. अनुपम खेर यांनी आपल्या सिनेकारकीर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु त्यांना खरी ओळख 'सारांश' चित्रपटाने मिळवून दिली. यानंर त्यांचं भाग्य उजळलं. त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. मोठ्या कलाकारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. आज आपल्या 67व्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनुपम खेर यांनी स्वत:ला विश केलं. त्यांनी इन्स्टाग्रामवर स्वत:साठी एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
अनुपम खेर यांनी आपल्या फिटनेसचा फोटो शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो पाहून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे की, "हॅप्पी बर्थडे टू मी. आज मी माझ्या 67व्या वर्षाची सुरुवात केली आहे. माझं नवं व्हिजन सांगण्यासाठी मी प्रेरित आणि फारत उत्सुक आहे. या फोटो माझ्या संथ प्रगतीचं उदाहरण आहे, जी मी मागील काही वर्षात केली आहे.
अनुपम खेर यांनी पुढे लिहिलं आहे की, 37 वर्षांपूर्वी तुम्ही एका तरुण अभिनेत्याला भेटला होता ज्याने आपल्या पदार्पणात 65 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. माझ्या कारकीर्दीत मी कलाकार म्हणून सर्वकाही केलं. पण एक स्वप्न होतं जे मी कायम पाहिलं होतं परंतु प्रत्यक्षात पूर्ण झालं नव्हतं. हे स्वप्न होतं स्वत:चा फिटनेस गांभीर्याने घेण्याचा आणि स्वत:चं बेस्ट व्हर्जन पाहण्याचं. मी फिटनेसच्या प्रवासाला चालण्यास सुरुवात केली, जे करता येऊ शकतं ते केलं. मला तुमच्यासोबत माझा प्रवास शेअर करायचा होता. मी माझे चांगले आणि वाईट दिवस तुमच्यासोबत शेअर करेन. शिवाय न्यू मी सेलिब्रेट करने. मला शुभेच्छा द्या. हे 2022 आहे, जय हो."
अनुपम खेर यांनी आपल्या सिनेकारकीर्दीत विलनपासून विनोदी आणि गंभीर अशा अनेक प्रकारची पात्र साकारली आहे. लवकरच ते द काश्मीर फाइल्स आणि ऊंचाई मध्ये झळकणार आहे. चाहत्यांना त्यांच्या चित्रपटांची कायमच प्रतीक्षा असते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
