Abhishek Bachchan Bought Six Flats: अभिषेक बच्चनने मुंबईत तब्बल सहा लक्झरी अपार्टमेंट्स केले खरेदी, किती मोजली रक्कम?
Abhishek Bachchan Bought Six Flats: अभिनेता अभिषेक बच्चन यानेदेखील आता मुंबईत अपार्टमेंट खरेदी करून मोठी गुंतवणूक केली आहे.
Abhishek Bachchan Bought Six Flats: अनेक बॉलिवूड कलाकार मालमत्ता खरेदी करून गुंतवणूक करत असतात. जमीन अथवा फ्लॅट, फार्म हाऊस खरेदी करून गुंतवणूक करत असतात. अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यानेदेखील आता मुंबईत अपार्टमेंट खरेदी करून मोठी गुंतवणूक केली आहे. अभिषेकने मुंबई उपनगरातील एक नव्हे तर तब्बल सहा लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहेत. या फ्लॅटची रक्कम कोटींमध्ये आहे.
अभिषेक बच्चनने खरेदी केले सहा अपार्टमेंट...
'मनी कंट्रोल'ने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेता अभिषेक बच्चनने ओबेरॉय रियल्टीने ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 अपार्टमेंट खरेदी केले आहेत. या सहा अपार्टमेंटचे एकूण क्षेत्रफळ जवळपास 4 हजार 894 स्क्वेअर फूट इतके आहे. प्रति स्क्वेअर फूट 31 हजार 498 रुपये दराने विक्री करण्यात आली आहे. अपार्टमेंट्सच्या खरेदी करारावर 5 मे रोजी स्वाक्षरी झाली असल्याची माहिती आहे.
अभिषेक बच्चनने खरेदी केलेले सहा अपार्टमेंट्स बोरिवली पूर्व येथील पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या लगत असलेल्या इमारतीच्या 57 व्या मजल्यावर आहे. या अपार्टमेंट्सची विक्री 10 कारच्या पार्किंगसह करण्यात आली आहे.
अभिषेक बच्चनने खरेदी केलेले फ्लॅट्स किती मोठे?
वृत्तानुसार, अभिषेक बच्चनने खरेदी केलेल्या सहापैकी दोन फ्लॅटचे क्षेत्रफळ हे 252 चौफूट आहे. तर दोन फ्लॅट्सचे क्षेत्रफळ हे 1100 चौफूट आहे. तर, इतर दोन फ्लॅट्स हे 1094 चौफूट इतके आहे. अभिषेक बच्चनने 15 कोटींहून अधिक रक्कम मोजली असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
View this post on Instagram
अभिषेकने याआधी केली होती गुंतवणूक
अभिषेकने ओबेरॉय रियल्टी अपार्टमेंटमध्येही गुंतवणूक केली आहे. 2021 मध्ये, त्याने ओबेरॉय रियल्टीच्या 'ओबेरॉय 360 वेस्ट' प्रकल्पातील एक अपार्टमेंट वरळी, मुंबई येथे 45.75 कोटी रुपयांना विकले. 2014 मध्ये त्यांनी 41 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीत हे अपार्टमेंट विकत घेतले होते. आणि आता त्याने सुमारे 15 कोटी रुपयांना 6 अपार्टमेंट खरेदी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
अमिताभ बच्चन यांची जमीन खरेदी
या वर्षाच्या सुरुवातीला, बॉलिवूडचे बिग बी आणि अभिषेक बच्चन यांचे वडील अमिताभ बच्चन यांनीही अलिबागमध्ये 10 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली होती. बिग बींनी जानेवारीच्या सुरुवातीला अयोध्येत गुंतवणूक केली होती. त्यांनी 'द हाउस ऑफ अभिनंदन लोढा' (HoABL) कडून 10,000 चौरस फूट जमीन खरेदी केली होती.