एक्स्प्लोर
हा अजून आई-वडिलांसोबत राहतो, अभिषेक बच्चन ट्रोल
अभिषेक बच्चन या वयातही आई-वडिलांसोबत राहत असल्याचं म्हणत यावेळी एका यूझरने त्याची टेर खेचली.
मुंबई : बॉलिवूडचा लाडका ज्युनिअर बी अर्थात अभिषेक बच्चन अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतो. कधी लेक आराध्यावरुन, तर कधी पत्नी ऐश्वर्यावरुन. अभिषेक बच्चन या वयातही आई-वडिलांसोबत राहत असल्याचं म्हणत यावेळी एका यूझरने त्याची टेर खेचली.
'तुमच्या आयुष्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. लक्षात ठेवा, अभिषेक बच्चन अजूनही आपल्या पालकांसोबत राहतो.' असं ट्वीट एका व्यक्तीने ट्विटरवर केलं. दरवेळीप्रमाणे अभिषेकने या ट्रोलरलाही शिंगावर घेतलं. 'हो, मी माझ्या पालकांसोबत राहतो. त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे' असं उत्तर अभिषेकने ट्रोलरला दिलं.
'कधी तुम्ही पण पालकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला स्वतःविषयी चांगलं वाटेल.' असा टोलाही अभिषेकने ट्रोलरला लगावला. अनेक जणांनी या ट्रोलरवरच टीकेचा भडिमार केला आहे. पण यानंतरही त्याने निर्लज्जपणे अभिषेकविषयी आपला हेका कायम ठेवला.
अभिषेक बच्चन पत्नी- अभिनेत्री ऐश्वर्या राय, मुलगी आराध्या, वडील बिग बी अमिताभ बच्चन आणि आई- अभिनेत्री, खासदार जया बच्चन यांच्यासोबत 'जलसा' बंगल्यात राहतो.
अभिषेक 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हाऊसफुल्ल 3' नंतर मोठ्या पडद्यावर दिसला नाही. लवकरच तो तापसी पन्नूसोबत 'मनमर्झिया' चित्रपटात झळकणार आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 'ढाई अक्षर प्रेम के'(2000), 'कुछ ना कहो'(2003), 'बंटी और बबली'(2005), 'उमराव जान' (2005), 'धूम-2'(2006), आणि 'गुरु'(2007) या 6 चित्रपटांमध्ये लग्नापूर्वी काम केलं होतं. लग्नानंतर दोघं 'सरकार राज'(2008) आणि 'रावन' (2010) चित्रपटात एकत्र झळकले. ऐश्वर्याने 'गुजारिश' (2010) चित्रपटानंतर ब्रेक घेतला. आराध्याच्या जन्मानंतर 2015 मध्ये ऐश्वर्याने 'जज्बा'तून पुनरागमन केलं. त्यानंतर 'सरबजीत' (2016) आणि 'ऐ दिल है मुश्किल' (2016) मध्ये ती दिसली. अभिषेक 'रावन'नंतर 'धूम-3', 'हॅप्पी न्यू ईयर', 'हाऊसफुल-3' मध्ये झळकला.Thank you guys for the attention. Get off your computers otherwise your parents will come and scold you. Thanks for checking out my profile pic... now please go back and jerk off to @juniorbachchan. Remember gentlemen he is a 42 year old man that lives with his parents.
— Ybn (@stillyoungest) April 18, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement