एक्स्प्लोर

Aamir Khan : आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका; ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

Aamir Khan Mother Heart Attack : आमिर खानच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Aamir Khan Mother Zeenat Heart Attack : बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या चर्चेत आहे. आमिरच्या आईला म्हणजेच जीनत हुसेन (Zeenat Hussain) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

रिपोर्टनुसार, आमिर खान पाचगणीत कुटुंबियांसोबत दिवाळी जल्लोषात साजरी करताना दिसून आला. दरम्यान जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर आमिरने लगेचच त्यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आणले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आमिरदेखील सध्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात आईसोबत आहे. 

जीनत हुसेन यांची प्रकृती कशी आहे?

जीनत हुसेन यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. जीनत हुसेन यांच्या प्रकृतीसंदर्भात कोणत्याही अफवा आणि चुकीची माहिती न पसरवण्याचे आवाहन आमिर आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलं आहे. 

एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार,"जीनत हुसेन यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं तेव्हा त्यांची प्रकृती खूप नाजूक होती. पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. आईच्या प्रकृतीसंदर्भात प्रत्येक अपडेट आमिर डॉक्टरांकडून घेत आहे".

'कॉफी विथ करण'च्या एका भागात आमिर नुकताच दिसून आला होता. कार्यक्रमादरम्यान त्याने आईसंदर्भात भाष्य केलं होतं. आमिरला त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवायला आवडतं. आई आणि मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ कसा घालवता येईल याकडे आमिरचं लक्ष असतं. 

आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. आता हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूर मुख्य भूमिकेत होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aamir Khan Productions (@aamirkhanproductions)

संबंधित बातम्या

Laal Singh Chaddha Box Office Collection: ‘लाल सिंह चड्ढा’ला सुट्टीचा फायदा मात्र, तरीही कमाईचा आकडा कमीच! पाहा किती जमवला गल्ला..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? 19 जुलैला मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन 
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? 19 जुलैला मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन 
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी गावाकडे मुंबई पालिकेचं दुर्लक्ष? रस्त्यांची अवस्था भीषण, स्थानिकांमध्ये नाराजी
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी गावाकडे मुंबई पालिकेचं दुर्लक्ष? रस्त्यांची अवस्था भीषण, स्थानिकांमध्ये नाराजी
Bigg Boss Marathi : मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 
मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 
Sharad Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा शरद पवाराच्या पक्षात प्रवेश, वाचा नावांची यादी
अजितदादांच्या बालेकिल्ल्याला शरद पवारांनी लावला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा पक्षात प्रवेश, आगामी निवडणुकीत होणार मोठा फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 11AM एबीपी माझा हेडलाईन्स 11 AM 17 July 2024 Marathi NewsAjit Gavhane To Join Sharad Pawar : अजितदादा गटाचे शहराध्यक्ष शरद पवार गटात प्रवेश करणारABP Majha Headlines 10AM एबीपी माझा हेडलाईन्स 10 AM 17 July 2024 Marathi NewsAshadhi Ekadashi | विठुरायाच्या महापूजेसाठी सटाण्यातील 'या' शेतकरी दाम्पत्याला मिळाला मान!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? 19 जुलैला मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन 
समाजवादी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढणार? 19 जुलैला मुंबईत करणार शक्तिप्रदर्शन 
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी गावाकडे मुंबई पालिकेचं दुर्लक्ष? रस्त्यांची अवस्था भीषण, स्थानिकांमध्ये नाराजी
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरी गावाकडे मुंबई पालिकेचं दुर्लक्ष? रस्त्यांची अवस्था भीषण, स्थानिकांमध्ये नाराजी
Bigg Boss Marathi : मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 
मालिकांमधील कलाकारांची बिग बॉसच्या घरात होणार एन्ट्री? 'या' अभिनेत्यांच्या नावाची जोरदार रंगली चर्चा 
Sharad Pawar: अजितदादांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा शरद पवाराच्या पक्षात प्रवेश, वाचा नावांची यादी
अजितदादांच्या बालेकिल्ल्याला शरद पवारांनी लावला सुरूंग; पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांचा पक्षात प्रवेश, आगामी निवडणुकीत होणार मोठा फायदा
PHOTO : अनंत अंबांनी आणि तैमूरमध्ये एक खास कनेक्शन, तुम्हाला माहितीय? समोर आलाय फोटो...
अनंत अंबांनी आणि तैमूरमध्ये एक खास कनेक्शन, तुम्हाला माहितीय? समोर आलाय फोटो...
नांदेडमध्ये अतिमुसळधार पाऊस, सहा तालुक्यातील 14 मंडळांमध्ये अतिवृष्टी
नांदेडमध्ये अतिमुसळधार पाऊस, सहा तालुक्यातील 14 मंडळांमध्ये अतिवृष्टी
Hasan Mushrif : अतिरेकी यासिन भटकळ कधी, कुणाकडे राहायला होता याची चौकशी करणार; मंत्री हसन मुश्रीफांचं मोठं विधान
अतिरेकी यासिन भटकळ कधी, कुणाकडे राहायला होता याची चौकशी करणार; मंत्री हसन मुश्रीफांचं मोठं विधान
मुंबईकरांनो सावधान! पुढील 24 ते 36 तास महत्वाचे, पावसाचा जोर अधिक वाढणार 
मुंबईकरांनो सावधान! पुढील 24 ते 36 तास महत्वाचे, पावसाचा जोर अधिक वाढणार 
Embed widget