एक्स्प्लोर
अल्लाउद्दीन खिल्जीच्या 25 कहाण्या!
ट्रेलरमध्ये त्याचा एकही डायलॉग नसतानाही त्याचा लूकच सांगून जातो की हा चित्रपट खलनायकाचा आहे.
मुंबई: एका चित्रपटाचा ट्रेलर येतो... हिरोच्या डायलॉगची खूप चर्चा होते... हिरॉईनच्या सुंदरतेवर खूप बोललं जातं मात्र यापेक्षाही अधिक चर्चा होते ते चित्रपटातल्या खलनायकाची.
ट्रेलरमध्ये त्याचा एकही डायलॉग नसतानाही त्याचा लूकच सांगून जातो की हा चित्रपट खलनायकाचा आहे.
पद्मावत मोठ्या पडद्यावर झळकलाय, आणि सर्वात जास्त चर्चा आहे खलनायकाच्या भूमिकेत असणाऱ्या रणवीर सिंगची. ज्याची भूमिका पाहूनच लोक त्याला शिव्या घालू लागतात. मात्र या शिव्या खरंतर त्याने साकारलेल्या कसदार भूमिकेला सार्थक ठरतात.
खिल्जीच्या 25 कहाण्या
- जर एकाही डायलॉगविना खलनायकाचा दरारा जाणवू लागतो, तर विचार करा की त्या खलनायकाचं असणं किती कापरं भरवणार असेल. पद्मावतच्या ट्रेलर मध्ये रणवीरची साधी झलक पाहिल्यानंतरही त्याच्या करिअरमधली ही सर्वात आव्हानात्मक भूमिका असल्याचं लक्षात येतं. खरंतर ही भूमिका साकारण्याच्या आधी रणीवरचा विचार नव्हता. मात्र भंसाळींना नकार देणंही त्याच्यासाठी कठीण होतं. शेवटी त्यानं भूमिका स्वीकारली आणि ती लिलया पेलली सुद्धा.
- खलनायकाची भूमिका साकारण्यासाठी रणवीरनं त्या कॅरेक्टरला स्वत: शी वाहून घेतलं. फिल्मचं शूटिंग संपल्यानंतर खिल्जीमध्ये असणारी निगेटिव्हीटी आपल्या आयुष्यातून संपवण्यासाठी रणवीरला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागला.
- खरंतर खिल्जीची भूमिका साकारण्यासाठी संजय लीला भन्साळींनी रणवीरला त्याच्या सोयीनुसार काहीशी मोकळीक दिली. मात्र ज्यावेळी रणवीर हवा तसा टेक नव्हता त्यावेळी तो सेटवरून काही वेळासाठी निघून जायचा...आणि पुन्हा येऊन टेक द्यायचा.
- रणवीर सिंग जवळपास वर्षभर अल्लाउद्दीन खिल्जीच्या गेटअपमध्ये राहिला. त्याने आपले केस, दाढी वाढवली. आणि ज्यावेळी फिल्मचं शूटिंग संपलं त्यानंतर त्यानं त्या गेटअप मधला शेवटचा फोटो ट्विटरवर शेअर करून, आपल्या त्या लूकला बाय बाय केलं.
- पद्मावतच्या क्लायमॅक्सच्या शूटिंग दरम्यान रणवीरच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.. क्लायमॅक्सचं शूट करताना रणवीर आपल्या भूमिकेत शिरून इतका बेभान झाला होता की शूटिंग दरम्यान त्याला दुखापत झाली हे त्याच्या लक्षात आलं नाही. शेवटी जेव्हा डायरेक्टर कट म्हणाले त्यावेळी तो थांबला आणि तिथल्या क्रू मेंबरच्या ही गोष्ट लक्षात आली.
- रणवीरचं पूर्ण नाव आहे रणवीर सिंह भवनानी. मुंबईच्या एका सिंधी कुटुंबात 6 जुलै 1985 ला रणवीरचा जन्म झाला. लहानपणापासूनच अभिनेता होण्याचं रणवीरचं स्वप्न होतं. कारण शाहरूख आणि सलमान ज्या ठिकाणी रहायचे त्याच ठिकाणी रणवीर राहायचा.
- फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केल्यानंतर रणवीर आपलं नाव बदलण्याच्याही विचारात होता कारण त्याचं नाव रणबीर कपूर याच्याशी मिळतं जुळतं होतं.
- ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे की रणवीर सिंह हा सोनम कपूरचा मावसभाऊ आहे.सोनमची आई सुद्धा लग्नाआधी भवनानी कुटुंबातली होती.
- रणवीर सिंह मुंबईच्या H.R. College of Commerce and Economics मधून शिकला. कॉलेजमध्ये असताना धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची कन्या आहना देओल ही रणवीरची खास मैत्रिण होती. कॉलेजमध्ये असताना त्यांच्या जोडीची खूप चर्चा होती. दोघांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही मात्र त्यांच्यातली मैत्री पक्की होती. नंतर आहनाच्या लग्नालाही रणवीर उपस्थित राहिला होता.
- मुंबईतलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रणवीरनं अमेरिकेतल्या इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये पाऊल ठेवलं. तिथेच त्याने थिएटर आणि अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षणानंतर रणवीर पुन्हा मुंबईत दाखल झाला. आणि इथून सुरू झालं रणवीरचं ब़ॉलिवूड साठीचं स्ट्रगल. बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावू पाहाणाऱ्या रणवीरला जबरदस्त संघर्षही करावा लागला...
- जेव्हा बॉलिवूडमधल्या संघर्षाला फळ मिळत नव्हतं त्यावेळी रणवीरनं आपलं लक्ष क्रीएटीव्ह रायटिंगकडे वळवलं. प्रसिद्ध एॅड एजेन्सी ओ एन्ड एम मधून त्यानं लिखाणाला सुरूवात केली.
- रणवीरच्या या वाटचाली दरम्यान त्याला अनेक अॅड आणि म्युजिक व्हीडिओजच्या ऑफरही आल्या. मात्र रणवीरनं त्या रिजेक्ट केल्या. कारण रणवीरचं म्हणणं होतं की एकतर तो फिल्मचा हिरो बनेल नाहीतर कुणीच नाही.
- करियरच्या सुरूवातीला तो दिग्दर्शक शाद अली यांच्यासोबत काम करायचा. मात्र तिथे रणवीरला इतकं काम करावं लागत होतं की कामाच्या धावपळीत त्याला स्वत:कडे पाहाण्यालाही उसंत मिळत नव्हती. त्याचं वजन खूपच वाढलं होतं. व्यायामाला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यानं त्या कामाला सोडचिठ्ठी दिली आणि मुंबईच्या प्रसिद्ध अॅक्टींग स्कूलमध्ये प्रवेश घेतला.
- मात्र हीरो बनण्याचं रणवीरचं स्वप्न अद्यापही अधूरं होतं कारण हिरोच्या भूमिकेसाठीची ऑफर त्याला अजूनही आलेली नव्हती...त्या नंतर रणवीरनं पृथ्वी थिएटर जॉईन केलं. संघर्ष इथेही सुरूच होता. पृथ्वी थिएटरमध्ये असताना तर तिथे काम करणाऱ्या अभिनेत्यांसाठी रणवीरनं समोसे आणायचं आणि सफाईचंही काम केलं. लोकांसाठी समोसे आणणाऱ्या रणवीरला कदाचित त्यावेळी हे लक्षातही आलं नसेल की लवकरच आपलं नशीब पालटणार आहे... मात्र आयुष्यात पहिली फिल्म करण्याच्या आधी आलेल्या 3 ऑफर्स रणवीरनं नाकारल्या होत्या.
- शेवटी रणवीरला एक एक करून 3 फिल्म मिळाल्या. मात्र रणवीर या तिन्ही फिल्ममधल्या आपल्या भूमिकेवर खूश नव्हता. कारण बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं ते मोठ्या फिल्म मध्ये झळकून असं त्यानं मनाशी पक्कं केलं होतं. त्यामुळेच त्यानं य़ा आधीच्या तिन ऑफर नाकारल्या.
- अखेर यशराज फिल्मच्या बँण्ड बाजा बारात च्या ऑडिशनसाठी रणवीरला बोलवण्यात आलं. मात्र ज्यावेळी फिल्मचे कास्टिंग डिरेक्टर शानू शर्मानं रणवीरला ऑडिशनसाठी बोलवायला फोन केला त्याचवेळी नेमका रणवीर कुठल्यातरी मुलीसोबत डेट वर गेला होता... त्याने शानूंचा फोनही घेतला नाही...
- कुठूनतरी ही खबर रणवीरला लागली आणि शेवटी यशराज स्टुडिओचे निर्माता आदित्य चोपडा यांनी रणवीरला पाहिलं. आणि त्यांनी रणवीरलाच या फिल्मचा हिरो करण्याचं घोषित केलं. कारण खूप वर्षांनी यशराज प्रॉडक्शन एक अशी फिल्म लॉन्च करत होते जी सोलो हिरोवर बेस होती.
- रणवीरच्या अडचणी इथेच संपत नाहीत. संपूर्ण सिनेमा तयार होताना आणि तो रिलीज झाल्यानंतरही रणवीरच्या वडिलांनी पैसा दिला असल्याचा आरोप करण्यात आला. या गोष्टीने रणवीरला अत्यंत त्रास दिला. कारण या यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अभिनय हेच सर्वात मोठं अस्त्र त्याच्याकडे होतं.
- रणवीरला बँड बाजा बारातसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण करणाऱ्या अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर रणवीरने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि आज बॉलिवूडच्या सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं.
- रणवीर त्याच्या आईच्या सर्वाधिक जवळ आहे. शिवाय बहिण रितिकावर असलेलं त्याचं प्रेम सर्वश्रुत आहे. शुटिंगच्या दरम्यान कुठेही असो मात्र तो दरवर्षी राखीपौर्णिमेला बहिणने पाठवलेली राखी न चुकता बांधतो. आणि हातात बांधलेली राखी जोवर स्वत: हून तुटत नाही तोपर्यंत तो ती राखी हातातच ठेवतो.
- रणवीरच्या लव्ह लाईफबाबत बोलायचं झालं तर त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं जातं. त्याचा बँड बाजा बारात हा पहिला सिनेमा आला तेव्हा त्याचं नाव अनुष्का शर्माशी जोडलं गेलं. नंतर त्यांच्या ब्रेकअपचीही चर्चा झाली. मात्र सध्या ते चांगले मित्र आहेत.
- संजय लीला भन्साळी यांच्या रामलीला सिनेमाच्या वेळी त्याची आणि दीपिकाची जवळीक वाढली. आणि याच नात्याचं रुपांतर प्रेमात झालं. 2016 मध्ये IIFA अवॉर्डमध्ये (आयफा सोहळ्यात) रणवीरने दीपिकाशी असलेलं प्रेम जाहीर केलं. याच शोमध्ये दीपिकाचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरने दीपिका आणि रणवीरला लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर यांचा साखरपुडा झाल्याचीही चर्चा सुरूय... आणि रणवीरच्या आई बाबांनी दीपिकाला साडी आणि दागिन्यांचं गिफ्ट दिल्याचंही बोललं जातंय...
- 2015 मध्ये रिलीज झालेल्या रणवीर आणि दीपिकाच्या बाजीराव मस्तानीनंही बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. आणि रणवीरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. हाच सिनेमा पाहिल्यानंतर बिग बी अमिताभ बच्चन यांनी पत्र लिहून त्याचं कौतुक केलं होतं.
- रणवीरला अभिनयाशिवाय रॅपचीही आवड आहे. त्याने लेडिज वर्सेस रिक्की बहल या सिनेमात एक रॅप केला होता. तर इतर अभिनेत्यांच्या फिल्म्सना प्रमोट करण्यासाठी रणवीर स्वत: व्हिडीओ द्वारे शुभेच्छाही देतो...
- वजन कमी करण्यासाठी रणवीरने त्याच्या डाएटमध्ये खूप बदल केले आहेत. आजही तो कार्बोहायट्रेड असणारे पदार्थ टाळतो. आणि आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जास्त प्रोटिन्सयुक्त आहार घेण्यावर त्याचा भर असतो...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement