एक्स्प्लोर

Happy Birthday Akshay Kumar : स्ट्रगलर ते बॉलिवूडचा खिलाडी! अक्षय कुमारच्या आयुष्यातील रंजक किस्से

Happy Birthday Akshay Kumar : अफाट संघर्ष आणि अभिनय कौशल्य, सोबत काम करताना रिस्क घेण्याची तयारी, या सर्व गोष्टींमुळे अक्षय कुमारने आपला वेगळा असा एक चाहता वर्ग तयार केलाय.

मुंबई : बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करुन सुपरस्टार बनलेल्या मोजक्या अभिनेत्यांच्या यादीत अक्षय कुमार आघाडीवर आहे. अफाट संघर्ष आणि अभिनय कौशल्य, सोबत काम करताना रिस्क घेण्याची तयारी, या सर्व गोष्टींमुळे अक्षय कुमारने आपला वेगळा असा एक चाहता वर्ग तयार केलाय. अक्षय कुमार म्हणजेच राजीव हरी ओम भाटिया. अमृतसरमधील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात अक्षयचा जन्म झाला. वडील सरकारी कर्मचारी होते. अगदी लहान वयातच अक्षयमध्ये एक कलाकार दिसू लागला होता.  त्याचे शिक्षण हे मुंबईत झाले आहे.

अक्षयने सौगंध या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याच्या खिलाडी या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने आजवर रुस्तम, एअरलिफ्ट, रावडी राठोड, वेलकम, ओह माय गॉड, हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.अभिनेता झालो नसतो तर...मी जर अभिनेता झालो नसतो तरी मी मार्शल आर्ट ट्रेनर असतो, असं अक्षय कुमारने अनेक मुलाखतीतून सांगितलं आहे.

अक्षय कुमार आणि त्याचे खास किस्से
राजीव भाटिया ते अक्षय कुमार
बॉलिवूडच्या या खिलाडीला सगळं जग अक्षय कुमार या नावाने जरी ओळखत असलं तरी त्याचं खरं नाव आहे राजीव हरी ओम भाटिया.

अक्षय जेव्हा वेटर म्हणून काम करायचा...
बॉलिवूडमध्ये येण्याआधी अक्षय कुमार बँकॉकमधल्या एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता.

जन्म अमृसरचा, नागरीकत्व कॅनडाचं
अक्षय कुमारचा जन्म अमृसरचा असला तरी त्याच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे.

पोर्टफोलिओच्या बदल्यात लाईट बॉय म्हणून काम
मायानगरीत दाखल झाल्यानंतर अक्षयने सुरुवातीला लाईट बॉय म्हणून काम केलं. ज्याच्या बदल्यात त्याला त्याचा पोर्टफोलिओ बनवून मिळाला.

सौगंध' सिनेमापासून फिल्मी आयुष्याची सुरुवात
1991 मध्ये आलेला 'सौगंध' हा अक्षय कुमारच्या कारकीर्दीतला पहिला सिनेमा. राज सिप्पी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

आठ सिनेमांच्या नावात 'खिलाडी'
नावामध्ये खिलाडी असलेल्या आठ फिल्म अक्षयने केल्यात. आणि म्हणूनच तो बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून ओळखला जातो.

जीवावर बेतलेली 'ती' फाईट
खिलाडीयों को खिलाडी या सिनेमात तो डब्ल्यू डब्ल्यू एफ चॅम्पियन अंडरटेकरसोबत झुंजला. या फाईट सीनदरम्यान त्याला जबरदस्त दुखापत झाली. त्याची पाठ आणि मान जवळपास मोडली होती.

तब्बल 15 वेळा 'विजय' आणि 'राज'
अक्षयने साकारलेल्या भूमिकांमध्ये आठ वेळा त्याचं नाव 'विजय' होतं तर सात वेळा तो 'राज' या नावाने रुपेरी पडद्यावर झळकला.

राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी
2017 मध्ये अक्षयने सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकवला. 'एअरलिफ्ट' या सिनेमासाठी अक्षयला सन्मानित करण्यात आलं.

2009 मध्ये 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित
2009 मध्ये अक्षय कुमारला भारत सरकारडून अक्षयला पद्मश्री हा नागरी सन्मान बहाल करण्यात आला.

अक्षयला कॅनडातील विंडसर विद्यापीठाकडून डॉक्टरेट
अक्षयला कॅनडातील विंडसर विद्यापीठाकडून डॉक्टरेट देण्यात आली. सिनेक्षेत्रातील योगदानासाठी विद्यापीठाने हा गौरव केला.

अक्षय कुमार थाई पदार्थांच्या प्रेमात
सतत जगभ्रमंती करणाऱ्या अक्षयला थाई पदार्थांबद्दल विशेष प्रेम आहे. त्याच्या जेवणात थाई पदार्थांचा आवर्जून समावेश असतो.

शूटिंगदरम्यान शार्क माशासोबत लढाई
अक्षय कुमार हा फक्त अभिनेता नाही तर तो अॅक्शन हिरो आहे. अवघड स्टंट्स स्वत:ला करण्यावर त्याचा भर असतो. अनेकदा ते त्याच्या जीवावरही बेतलं होतं. केपटाऊनमध्ये शूटिंग करताना त्याला शार्क माशाचा सामना करावा लागला. लाईफगार्ड्स वेळीच पोहोचल्यानं गंभीर दुर्घटना टळली.

अभिनेता ते पार्श्वगायक...
निर्माता आणि अभिनेत्याच्या भूमिकेत दिसलेला अक्षय गायक म्हणूनही आपल्या समोर आला. 'स्पेशल छब्बीस' या सिनेमातलं 'मुझ में तू' हे रोमॅण्टिक गाणं त्याने गायलं.

अक्षयचा आवडता सिनेमा 'लाईफ इज ब्युटीफुल'
ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट'लाईफ इज ब्युटीफुल' हा अक्षय कुमारचा सगळ्यात आवडता सिनेमा आहे

'ट्विंकल खन्ना माझ्यासाठी लकी'
ट्विंकल खन्नामुळेच आपलं आयुष्य बदललं असल्याचं अक्षय मानतो. कारण त्यांच्या लग्नाआधी अक्षयचे सलग 14 सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले होते.

कोट्यवधींच्या लक्झरी कार्सचा ताफा
अक्षयच्या ताफ्यामध्ये अनेक लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. त्यामध्ये साडे अकरा कोटींची रोल्स रॉइस फॅण्टम, साडेतीन कोटींची बेंटले, पाऊणे दोन कोटींची रेंज रोव्हर अशा अनेक सुपर कार्सचा समावेश आहे.अक्षय कुमार त्याच्यासाठी 9 हा आकडा लकी मानतो. त्यामुळे जवळपास सर्वच गाड्यांचा नंबर 909 असा आहे.

जॉन अब्राहमकडून 30 लाखांची बाईक गिफ्ट
लक्झरी कार्सप्रमाणेच अक्षय सुपर बाईक्सचाही चाहता आहे. त्यापैकी एक त्याचा मित्र जॉन अब्राहमने गिफ्ट केली आहे. हार्ले डेविड्सन कंपनीची तब्बल 30 लाखांची बाईक जॉनने अक्षयला गिफ्ट केली आहे.

सर्वाधिक कमाई करणारा भारतीय अभिनेता
फोर्ब्जने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे. 2020 मध्ये फोर्ब्सच्या यादीनुसार अक्षय कुमारनं यंदाच्या वर्षी जवळपास 362 कोटी रुपयांची कमाई केली.  

सामाजिक कामांमध्ये नेहमीच सहभाग
अक्षय कुमार केवळ अभिनयापुरता मर्यादित अजिबात नाही. अनेक सामाजिक कामांमध्ये त्याचा नेहमीच सहभाग असतो. मुलींसाठी त्याने मार्शल आर्ट्स ट्रेनिंग स्कूल सुरु केली आहेत. जिथे मुलींना स्वरक्षणाचं पूर्णपणे मोफत शिक्षण दिलं जातं. कोरोना काळात देखील अक्षयनं मोठ्या प्रमाणात मदत केली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'

व्हिडीओ

Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला
Mahayuti Full PC : मुंबई शिवसेना-भाजपचा 150 जागांवर एकमत, नवाब मलिक यांच्यासोबत जाण्यास विरोध
Sushma Andhare PC : ड्रग्ज प्रकरणी अंधारेंचा गौप्यस्फोट, प्रकाश शिंदेंवर आरोप; स्फोटक पत्रकार परिषद
Pradnya Satav BJP : प्रज्ञा सातव यांचं दणदणीत भाषण, भाजपमध्ये प्रवेश का? सगळं सांगितलं..
Sanjay Raut PC : ...तर एकनाथ शिंदे जेलमध्ये जातील, संजय राऊतांनी सगळंच काढलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदे सेनेचा स्पष्ट संदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
BMC Electin: मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
मुंबईत भाजप शिवसेनेत 150 जागांवर एकमत, उर्वरित जागांवर निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; अमित साटम म्हणाले, 'धनुष्यबाण, कमळ दोन्ही एकच आहेत, कोणत्याही कारणाने युती तुटणार नाही'
Savari Drugs Case : मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
मुलुंडच्या फूटपाथवरील ड्रग्जकांड साताऱ्यातील सावरीपर्यंत व्हाया पुणे कसं पोहोचलं, शिंदेंच्या भावाचं नाव कसं आलं? हादरवणारी कहाणी
Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
Embed widget