Bollywood Drug Case: 252 कोटींच्या ड्रग प्रकरणात श्रद्धा कपूरच्या भावाला समन्स; अंडरवर्ल्डशी कनेक्शन असणाऱ्या पार्टीमुळे कलाकारांचे धाबे दणाणले
या प्रकरणात देश विदेशातील ड्रग्स पार्ट्यांमधील कलाकार आणि राजकीय नेत्यांची नावे समोर आल्याने मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग आलाय.

Bollywood: बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा ड्रग प्रकरणामुळे काही बडे कलाकार अडचणीत आले आहेत. 252 कोटींच्या या ड्रग प्रकरणाची (Bollywood Drug Case) सध्या एकच चर्चा असून या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या (Shraddha Kapoor) भावाला सिद्धांत कपूरला (Siddhant Kapoor) अंमली पदार्थविरोधी पथकाने समन्स बजावला आहे. अंडरवर्ल्डशी जोडलेल्या या ड्रग प्रकरणाच्या चौकशीसाठी हा समन्स बजावण्यात आला आहे. 25 नोव्हेंबर रोजी त्याला आपला जबाब नोंदवण्यासाठी यंत्रणेसमोर हजर राहावे लागणार आहे.
या प्रकरणात देश विदेशातील ड्रग्स पार्ट्यांमधील कलाकार आणि राजकीय नेत्यांची नावे समोर आल्याने मुंबई पोलिसांच्या तपासाला वेग आलाय. या कारवाईमुळे सध्या मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
नेमके प्रकरण काय ?
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका उत्पादन युनिटमधून अंदाजे 252 कोटी किमतीचे मेफेड्रोन (MD ) ड्रग्स जप्त झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरत आहेत. या चौकशी दरम्यान, मुख्य आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याने केलेल्या खुलाशानुसार, भारतात आणि परदेशात ड्रग्जच्या पार्ट्या आयोजित करण्यात येणार होत्या. मोठे मोठे कलाकार, मॉडेल, रॅपर, फिल्ममेकर तसेच अंडरवर्ल्डच्या दाऊद इब्राहिमशी जोडलेले लोकही उपस्थित राहणार असल्याचं त्याने सांगितलं.तपासाची सूत्रे वेगाने फिरली. तपासात हाय प्रोफाईल पार्ट्यांमध्ये उपस्थित राहणाऱ्या लोकांमध्ये सिद्धांत कपूरचं नाव समोर आलं आहे. नाव आलं असलं तरी त्याच्या चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे. 25 नोव्हेंबर रोजी त्याला त्याचा जबाब नोंदवायचा आहे. यावरून पुढची कारवाई होईल असे सांगण्यात आले आहे.
या पार्टीमध्ये उपस्थित राहणाऱ्यांच्या लिस्टमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुयेन्सर ओरहान अवत्रामणी (ओरी) याचीही चौकशी करण्यात आली आहे. लवकरच सिद्धांत कपूर समन्सला उत्तर देण्यासाठी एएएमसी कार्यालयात हजर राहणार आहे.त्याच्या जबाबदातून अनेक गोष्टी समोर घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.252 कोटी रुपयांच्या ट्रक प्रकरणात मनोरंजन क्षेत्रातील आणखी कोण समोर येतंय याकडेही लक्ष आहे.
15 जणांना अटक
मुंबई पोलिसांनी 16 फेब्रुवारी 2024 रोजी कुर्ला परिसरातील कारवाईत परवीन बानो गुलाम शेख या महिलेला तब्बल 25 कोटी रुपयांच्या मेफेड्रॉनसह (एमडी) ताब्यात घेतले होते. या एकाच अटकेनंतर तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आणि ड्रग्ज पुरवठ्याची साखळी विक्रेते, पुरवठादार आणि उत्पादन करणाऱ्या गटांपर्यंत पोहोचत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी पुढील काही दिवसांत सुमारे 250 कोटी रुपये किमतीच्या एमडीशी संबंधित प्रकरणात जवळपास 15 जणांना अटक केली. तपासात परवीनला मिरा रोडमधील साजिद मोहम्मद आसिफ शेखकडून अमली पदार्थ मिळत असल्याचेही समोर आले, ज्यामुळे साजिदलाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
























