Kareena Kapoor | करीनाच्या बाळाचा जन्म होताच ‘औरंगजेब’, ‘बाबर’ ट्रेंडमध्ये; ही आहेत कारणं
उपरोधिक टीका करत, तर कोणी खिल्ली उडवत करीनानं आता तिच्या धाकट्या मुलाचं नाव 'औरंगजेब' किंवा 'बाबर' ठेवावं असा सूर आळवला आहे.
Kareena Kapoor बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिनं रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास एका मुलाला जन्म दिला. करीना आणि तिचा पती, अभिनेता सैफ अली खान हे दुसऱ्यांदा पालक होत आहेत. करीनाच्या बाळाच्या येण्यानं कपूर आणि पतौडी अशा दोन्ही कुटुंबांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. कलाविश्वापासून चाहत्यांपर्यंत, सर्वजण या सोलिब्रिटी कुटुंबाला, या सेलिब्रिटी जोडीला शुभेच्छा देत आहेत. पण, एक असा वर्गही आहे, जिथून करीनाला तिच्या बाळाच्या नावामुळं ट्रोल केलं जात आहे.
Kareena Kapoor च्या मुलाचे नाव काय असेल? इतर स्टार किड्सचे नाव आणि अर्थ जाणून घ्या
कारण ठरत आहे, ते म्हणजे करीनाच्या पहिल्या अर्थात मोठ्या मुलाचं नाव, तैमूर अली खान. याच कारणामुळं करीना आणि सैफला काही नेटकऱ्यांनी निशाण्यावर घेतलं आहे. उपरोधिक टीका करत, तर कोणी खिल्ली उडवत करीनानं आता तिच्या धाकट्या मुलाचं नाव 'औरंगजेब' किंवा 'बाबर' असं ठेवावं असा सूर आळवला आहे.
तैमूरच्या नावावरुन झाला होता वाद
2016 मध्ये करीनच्या पहिल्या बाळाचा जन्म झाला होता. ज्याचं ना तैमूर ठेवण्यात आलं होतं. पण, करीनाच्या पहिल्या बाळाच्या या नावावरुन अनेक वादाच्या विषयांनी डोकं वर काढलं. अनेक संघटना आणि धार्मिक गटांनी या नावाचा तीव्र विरोध केला होता. करीना तिच्या मुलाचं नाव एका क्रूर शासकाच्या नावारुन ठेवूच कशी शकते असाच नाराजीचा सूर अनेकांनी आळवला होता.
लव जिहादचाही आरोप
करीनाच्या मुलाच्या नावाला होणारा निषेध इथंच थांबला नव्हता. अनेकांना या साऱ्याला लव जिहादचंही नाव दिलं. काहींनी तर थेट करीनाच्या मुलाचं नाव हिंदू धर्माप्रमाणंच असावं असा आग्रही सूरही आळवला. या साऱ्या चर्चांच्या वलयामध्ये तैमूर मात्र भलताच प्रसिद्धीझोतात आला ही बाबही महत्त्वाची.
करीनाच्या बाळच्या जन्मानंतर सोशल मीडियावर वाव मिळेल त्या प्रत्येक चर्चेला उधाण येत आहे. त्यातच व्हायरल होणारे काही मीम्स खालीलप्रमाणे...
When everyone is suggesting name of Aurangzeb or Babur for the newborn child of #KareenaKapoorKhan and #SaifAliKhan, but none is suggesting the name of Tipu Sultan who also massacred Hindus in large number, Then Tipu be like - pic.twitter.com/b7trxvjY3I
— Lucifer Morningstar (@TheSarveshMisra) February 21, 2021
#KareenaKapoorKhan & #SaifAliKhan blessed with a new baby :
Aurangzeb | Taimur pic.twitter.com/qHmzawNlDx — ???????????????????????????? ⍟ (@rishabh_memes) February 21, 2021
#KareenaKapoorKhan and #SaifAliKhan blessed with their second baby boy.
Mera bhai Babar Ya Aurangzeb aa gya???????????????????????? pic.twitter.com/FowfWDT1Av — Taimur Ali Khan Parody (@PataudiTaimur) February 21, 2021
Aurangzeb today be like pic.twitter.com/tY6eeUwYzV
— Mayank Gupta (@MayankGtweet) February 21, 2021