मुंबई : फुफ्फुसाच्या कर्करोगाचा सामना करत असलेला अभिनेता संजय दत्तला पुन्हा एकदा लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लीलावती रुग्णालयातील सूत्रांनी एबीपी न्यूजला ही माहिती दिली आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रासलेल्या संजय दत्तला आज सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या सर्व चाचण्या घेतल्या गेल्या त्यानंतर सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.
संजय दत्त शनिवारी दुपारी मुंबईच्या अंधेरी भागात असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात जात असताना दिसला. त्यावेळी त्याची बहीण प्रिया दत्तही संजय दत्तसोबत उपस्थित होती. यासंदर्भात, लीलावतीच्या सूत्रांनी सांगितले की, संजय दत्तला असलेला फुफ्फुसाचा कर्करोग अॅडव्हान्स स्टेजला आहे. यासाठीच्या काही चाचण्या कोकिलाबेन रुग्णालयात करण्यात आल्या तर काही चाचण्या लीलावतीमध्ये केल्या जात आहेत.
संजय दत्तला अमेरिकेचा व्हिजा मिळणं अवघड; उपचारासाठी जाऊ शकतो सिंगापूरला
गेल्या शनिवारी 8 ऑगस्ट रोजी संजय दत्तला श्वास घेण्यात अडचण आल्यामुळे लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्याला डिस्चार्जही देण्यात आला. त्यानंतर दुसर्याच दिवशी संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याची बातमी समोर आली. संजय दत्त आपल्या उपचारासाठी अमेरिकेत जाऊ शकतो. पण मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी गुन्हेगार असल्याने संजय दत्तचा अमेरिकेचा व्हिसा मिळत नसल्याचं समोर येत आहे. अशा परिस्थितीत जर अमेरिकेत उपचार घेण्यासाठी त्याला व्हिसा मिळाला नाही तर पर्याय म्हणून उपचारांसाठी तो सिंगापूरला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
- मान्यता म्हणते, देवाने परीक्षेसाठी आम्हाला निवडलंय
- संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, उपचारासाठी परदेशात जाण्याची शक्यता
- Sadak 2 Trailer : रोमान्ससह अॅक्शनचा तडका, सडक 2 चा दमदार ट्रेलर लॉन्च
- श्वास घेण्यास त्रास होत असल्याने अभिनेते संजय दत्त मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल