मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.


रुग्णालयात दाखल करताच 61 वर्षीय संजय दत्त यांची कोविड-19 अँटीजेन टेस्ट करण्यात आली. जी नेगेटिव्ह आली आहे. त्यांची स्वॅब टेस्टही घेण्यात आली आहे. ज्यातून त्यांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले की नाही हे कळणार आहे. उद्या सकाळपर्यंत या चाचणीचा अहवाल येणार आहे.

"मी बोललो होतो यावर मात करणार"; अभिषेक बच्चन कोरोनामुक्त

लीलावती रुग्णालयाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. वी. रविशंकर यांनी एबीपी न्यूजशी फोनवर बोलताना सांगितले, की "रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या संजय दत्त यांची ऑक्सीजन लेवल कमी जास्त होत होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे रविशंकर यांनी सांगितले.


दिशा सुशांतची मॅनेजर नव्हतीच; मुंबई पोलिसांकडून स्पष्ट.. दोघांमधील व्हाट्सएप चॅटवरील Exclusive संभाषण

डॉ. रविशंकर पुढे म्हणाले, की "संजय दत्त यांना सध्यातरी कोविड वोर्डात भरती करण्यात आलेलं नाही. संजय दत्त हे निरिक्षणाखाली असून इतर काही चाचण्या करण्यात येणार आहेत.