बीड :आश्रमात ठेवलेल्या एका चौदा वर्षीय मुलीला चाळीस वर्षे इसमाने पळवून नेल्याचा प्रकार झाल्यानंतर बाल कल्याण समितीने आश्रमातून सात मुली व पाच अल्पवयीन मुलांची सुटका केली आहे. हा प्रकार बीड शहरा जवळच्या महानुभवपंताच्या आश्रमात घडला आहे.


बीड शहरापासून जवळच असलेल्या मांजरसुंबा घाटातील महानुभव पंथाच्या आश्रमातील एका 14 वर्षे वयाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची उघडकीस आल्यानंतर याच आश्रमातील अन्य 7 मुली आणि 5 अल्पवयीन मुलांचीही जिल्हा बाल हक्क समिती आणि पोलीसांनी येथील अश्रमावर छापा मारून सुटका केली आहे.

गंभीर बाब म्हणजे सुटका केलेल्या मुलातील अनेक मुलं हे देवाला सोडलेले होते, अशी माहिती आता समोर येत आहे. त्यातील एका चौदा वर्षीय मुलीला लहानपणी मोठे आजार होते. मात्र मात्र ते हॉस्पिटलमध्ये दुरुस्त झाले नाहीत म्हणून शेवटी त्या मुलीला आश्रमात आणून सोडले होते. त्यानंतर ती मुलगी मागच्या अनेक वर्षापासून या आश्रमामध्ये राहत आहे..

यातील काही मुलांना हे आध्यात्मिक शिक्षण मिळण्याच्या उद्देशाने या आश्रमात ठेवले असल्याचे कुटुंबियांनी सांगितले आहे.

देवस्थानावरील या मुलीच्या तक्रारीमुळे सात मुलींची सुटका झाल्याचे समोर आले आहे. मुलींची सुटका केल्यानंतर आता अनेक देवस्थानांमध्ये ठेवलेला अल्पवयीन आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. सार्वजनिक ठिकाण असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर असतो. अशा ठिकाणी देवस्थानकडून मुला-मुलींचा कोणत्या सुरक्षा घेतली जाते याचा तपास आता पोलिस करत आहेत.

14 वर्षीय मुलीला आश्रमातून एका चाळीस वर्षे इसमाने पळवून नेल्यानंतर हे आश्रमाने ही माहिती कुणालाही कळली नव्हती. मात्र त्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबीयांना हा प्रकार कळल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून त्या मुलीला ताब्यात घेतले आहे. मात्र ज्या व्यक्तीने तिला पळवून नेले होते तो अद्याप फरार आहे. त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीडच्या बाल कल्याण समितीने या मुलांची सुटका केल्यानंतर त्यांना आता बालसुधारगृह मध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र हा सगळा प्रकार अंधश्रद्धेतून घडला का? याचा तपास करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.