कालच या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज होणार होता, मात्र संजय दत्तला कॅंन्सर झाल्याची माहिती समोर आल्याने काल ट्रेलर रिलिज झाला नाही. ट्रेलरमध्ये आलिया-आदित्यची लव्ह केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. प्रेम, रोमांन्स आणि अॅक्शनने भरपूर असा हा चित्रपट असल्याचे ट्रेलरवरुन लक्षात येत आहे.
सडक या सिनेमानं कमालीची लोकप्रियता मिळवली होती. त्या सिनेमात पूजा भट्ट, संजय दत्त, सदाशिव अमरापूरकर यांच्या भूमिका होत्या. सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेली महाराणी कमालीची हिट ठरली होती. आता सडक 2 मध्ये महाराणीसारख्याच असणाऱ्या पात्राच्या भूमिकेत मराठमोठा मकरंद देशपांडे दिसून येत आहे.
1991 मध्ये आलेल्या पहिल्या भागात संजय दत्त आणि पूजा भट्ट ही जोडी रसिकांना दिसली होती. ती जोडी या सिनेमात असणार आहे. खरंतर पहिल्या पोस्टरपासूनच सडक 2 वादात सापडला होता. पहिल्या पोस्टरवरून काही लोकांनी कोर्टात धावही घेतली होती. हिंदू लोकांच्या भावना दुखावल्याचा ठपका यावर ठेवण्यात आला होता. दुसऱ्या पोस्टरमध्ये एक मोठा रस्ता दिसत असून तीन व्यक्तिरेखा या रस्त्यावरून चालताना दिसत होत्या.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यात महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्या नातेसंबंधांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. शिवाय, नेपोटिझममध्ये महेश भट्ट, आलिया भट्ट यांचं नावंही येत होती. याच पार्श्वभूमीवर सडक 2 चित्रपट प्रदर्शित होण्याला महत्व आहे.
पाहा ट्रेलर