एक्स्प्लोर

Divya Agarwal : ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच दिव्या अग्रवाल पापाराझींसमोर! व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Divya Agarwal : आता ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Divya Agarwal : ‘बिग बॉस ओटीटी’ विजेती दिव्या अग्रवालने (Divya Agarwal) हिने अभिनेता वरुण सूदसोबत ब्रेकअप करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर एक लांब पोस्ट लिहिली, ज्यामध्ये तिने तिचा प्रियकर वरुण सूदसोबत ब्रेकअपची जाहीर घोषणा केली. त्यांच्या ब्रेकअपची बातमी समजल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या दोघांचे वेगळे होणे चाहत्यांसाठी पूर्णपणे अनपेक्षित होते, कारण ही जोडी जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये होती.

वरुणसोबतच्या तिच्या ब्रेकअपचे कारण सांगताना, मॉडेल आणि अभिनेत्री दिव्या अग्रवालने लिहिले की, ‘वेगळे होण्याचा त्यांचा निर्णय तिची निवड होती आणि वरुण नेहमीच तिचा चांगला मित्र असेल.' यानंतर दिव्या आणि वरुण सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले. त्याचवेळी अनेकांनी या ब्रेकअपसाठी वरुणला दोषी म्हटले आहे. हे सगळं पाहून दिव्याला थांबता आलं नाही आणि तिने लगेच ट्रोल करणाऱ्यांना सुनावले.

ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली दिव्या!

आता ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली. प्रसिद्ध सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये दिव्या अग्रवाल स्पॉट झाली आहे. या व्हिडीओमध्ये, दिव्या टोन्ड जीन्स आणि स्लीव्हलेस टी-शर्टमध्ये दिसली होती आणि उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी टिंटेड सनग्लासेस परिधान केले होते. कॅज्युअल लूकमध्येही दिव्या सुंदर दिसली.

पाहा व्हिडीओ :

यादरम्यान पापाराझींनी तिची विचारपूस केली. व्हिडीओमध्ये फोटोग्राफर 'कशी आहेस... खंबीर रहा' असे म्हणताना ऐकू येत आहे. यावेळी दिव्या मात्र हसताना दिसली आणि तिने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे खास आनंदी शैलीत दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सही या व्हिडीओवर उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, काही लोकांनी तिच्या याच वागणुकीमुळे तिला ट्रोल देखील केले आहे. नेटकऱ्यांच्या मते, ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचे असे हसून मीडियाशी बोलणे योग्य नाही. यामुळेच त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Embed widget