एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6 Sachin Kumavat Eliminate: 'बिग बॉस मराठी'च्या घरातून 'चांगला माणूस' Eliminate; सगळेच सदस्य हमसून हमसून रडले!

Bigg Boss Marathi 6 Sachin Kumavat Eliminate: 'बिग बॉस'च्या घराला हलक्यात घेणं आणि संधीचं सोनं न करणं घरातील एका स्पर्धकाला महागात पडलं आहे.  

Bigg Boss Marathi 6 Sachin Kumavat Eliminate: 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi) सहावा सीझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. घरातील सदस्यांच्या कुरघोडी, वागणं, एकमेकांविरोधातली कट-कारस्थान सर्वच गोष्टी ऐन रंगात आल्या आहेत. पण, अजूनही काही स्पर्धकांचे डोळे उघडलेले नाही. तर, काही स्पर्धक अजूनही आपला खेळ दाखवत नाहीत, अशी खंत भाऊच्या धक्क्यावर अनेकदा रितेश देशमुखनं व्यक्त केली आहे. अशातच आता 'बिग बॉस'च्या घराला हलक्यात घेणं आणि संधीचं सोनं न करणं घरातील एका स्पर्धकाला महागात पडलं आहे.  

'बिग बॉस मराठी'च्या घरातून सहाव्या आठवड्या कोण घराबाहेर जाणार? याची संपूर्ण आठवडाभर चर्चा सुरू होती. अशातच अखेर रविवारी भाऊच्या धक्क्यावर सर्वांनाच धक्का बसला. सहाव्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी रोशन, सागर, राकेश, दीपाली, अनुश्री, रुचिता, सचिन, प्रभू आणि प्राजक्ता असे नऊ स्पर्धक नॉमिनेट झाले होते. या स्पर्धकांमधून तीन स्पर्धक डेंजर झोनमध्ये तर उर्वरित सहा स्पर्धक सेफ झोनमध्ये गेले. रोशन, रूचिता आणि सचिन हे तिघे डेंजर झोनमध्ये होते. या तिघांमधून एकाला घरचा रस्ता धरावा लागला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातून चांगल्या माणसाचं एलिमिनेशन झालं आहे. खान्देशचा किंग सचिन कुमावत (Sachin Kumavat) घरातून एलिमिनेट झाला. सहाव्या आठवड्यात सचिन कुमावतचं एलिमिनेशन झालं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

अहिराणी गाण्यासाठी प्रसिद्ध असलेला आणि खान्देशी किंग म्हणून नावारुपाला आलेला सचिन कुमावत बिग बॉसच्या घरातून एलिमिनेट झाला आहे. सचिन बिग बॉसच्या घरात म्हणावा तितका रमला नाही, असं म्हटलं तरी चालेल. मूळचा साध्यासुध्या स्वभावाचा सचिन कुमावत बिग बॉसच्या घरात कट-कारस्थान रचण्यात आणि खेळ समजण्यात कुठेतरी कमी पडला, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. पण, घरातील चांगला माणूस अशी ओळख त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण करण्यात मात्र सचिन कुमावत यशस्वी ठरला. त्याचं घरातील प्रत्येक स्पर्धकासोबत खूप घट्ट नातं निर्माण झालेलं. पण, घरात स्वतःसाठी स्टँड घेण्यात कमी पडल्यामुळे 'बिग बॉस मराठी'च्या घरातील त्याचा प्रवास संपला. 

दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या घरातून सचिन कुमावत बाहेर गेल्यानंतर आता घरात 12 ते 13 स्पर्धक शिल्लक राहिले आहेत. अशातच आता आणखी एक वाईल्ड कार्ड एन्ट्री घरात होणार असल्याचं बोललं जात आहे. आधीच वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आलेल्या राखी सावंतनं घरातील सदस्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. अशातच आता आणखी एका वाईल्ड कार्ड एन्ट्रीनं बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांचे धाबे दणाणार आहेत, हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi 6: आईच्या आठवणीत राखी सावंत ढसाढसा रडली, अनुश्री अन् प्राजक्ता फिदीफिदी हसल्या; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा राग विकोपाला, म्हणाली...

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget