जेवढ्या शिव्या तुम्ही सगळे देत नाही तेवढा हा एका रीलमध्येच देतो', क्रिकेटर दीपकनं केलं प्रणीतला रोस्ट, Video Viral
या सगळ्यात दीपकचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दीपक प्रणित मोरेची पोलखोल करताना दिसतोय.

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नुकताच फॅमिली वीक पार पडला. स्पर्धकांच्या घरातील सदस्यांनी बिग बॉसच्या (Bigg Boss19 ) घरात लावलेल्या हजेरीमुळे घरात भावनिक आणि आनंदाचे वातावरण तयार झाले होते. स्पर्धकांच्या घरातील सदस्य आल्यामुळे सगळेच स्पर्धक रिचार्ज झाल्यासारखे वाटले. सर्वात शेवटी फिल्म मेकर मालती चाहरचा भाऊ म्हणजेच क्रिकेटपटू दीपक चाहर बिग बॉसच्या घरात पोहोचला होता. दीपकने सर्वांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. दीपक घरात आल्यामुळे घरातील क्रिकेट प्रेमींसह सारेच जण सुखावले होते. मात्र या सगळ्यात दीपकचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये दीपक प्रणित मोरेची पोलखोल करताना दिसतोय.
काय म्हणाला दीपक चाहर?
बिग बॉसच्या घरात प्रणित मोरे इतरांना अरे तो शिव्या का देतोयस? असे म्हणताना दिसतो, पण मी त्याचा शो पाहिला आहे. जेवढ्या शिव्या तुम्ही सगळे मिळून दिला नसतील तितक्या तो एका रीलमध्ये देतो. आणि इथे मात्र म्हणतो की अरे तुम्ही शिव्या का देताय? असं म्हणत क्रिकेटर दीपक चाहरने प्रणित मोरेला रोस्ट केल्याचा दिसलं. त्यावर प्रणिताही हसून म्हणतो. माझ्या शोबद्दल तर मी आधीच बोललो आहे. मालतीनेही दीपकच्या बोलण्याला दुजोरा दिला. मग दीपकने ही सावरून घेतलं. तुम्हाला की प्रणित जेव्हा शोवरती शिव्या देतो तेव्हा त्या अशाच दिलेल्या असतात. पण जेव्हा बिग बॉसमध्ये लोक शिव्या देतात ते एकमेकांना देतात, त्यामुळे त्याला त्रास होत असेल. हा मजेशीर व्हिडिओ पाहून चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये धुमाकूळ घातला आहे.
View this post on Instagram
दरम्यान बिग बॉसच्या घरात दीपक चाहरच्या बहिणीची मालती चाहरची मैत्री फक्त प्रणित मोरे सोबतच झाली. यावरूनही तिच्या भावाने दीपकने त्याचं कौतुक केलं. दीपक गमतीने म्हणाला की प्रणितने मालतीशी मैत्री केल्याने त्याला फायदाच होणार आहे. आतापर्यंत अनेक क्रिकेटपटूंना त्यानी रोस्ट केलं आहे. आता क्रिकेटपटूशा बहिणीशीच मैत्री केल्याने प्रणितला इतर क्रिकेटपटून पासून काही धोका नाही असेही दीपक म्हणाला.






















