एक्स्प्लोर

तगड्या सिनेमासाठी बिग बींनी आकारलं तगडं मानधन

अश्विन नाग यांच्या नव्या सिनेमात अमिताभ यांना मिळालेल्या मानधनाची चर्चा सध्या ऑनलाईन विश्वात सुरू झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी अश्विन नाग यांच्या सिनेमासाठी मानधन म्हणून घेतले आहेत तब्बल 21 कोटी रुपये.

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अनेक विविध सिनेमाची चर्चा सुरु आहे. कोणता सिनेमा महागडा ठरतोय.. कोणता सिनेमा सगळ्यात लार्जर दॅन लाईफ टरतोय याची चर्चा होते आहे. यात काही सिनेमांची आवर्जून नावं घेतली जातायत. अयान मुखर्जीचा ब्रह्मास्त्र हा त्यापैकीच एक. सध्या या सिनेमाचं बजेट 300 कोटींच्या पुढे गेलं आहे. तर दुसरीकडे एस एस राजामौली महाभारत बनवू लागले आहेत. तोही सिनेमा बराच खर्चिक असणार आहे. तर आदिपुरुष हा ओम राऊत यांचा प्रभासची मुख्य भूमिका असलेला चित्रपटही मोठा असणार आहे. तर या सगळ्यात कडी आहे ती अश्विन नाग यांच्या नव्या सिनेमाची.

अश्विन नाग यांच्या या सिनेमात दीपिका पडुकोण आणि प्रभास यांच्या मुख्य व्यक्तिरेखा आहेत. आधी प्रभासला घेतानाच त्याला नेहमीच्या मानधनापेक्षा जास्त मानधन देऊन घेतल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर दीपिका पडुकोणनेही या सिनेमाला होकार देताना बक्कळ मानधन आकारल्याचं कळलं. आजवर कोणाही अभिनेत्रीने कधी घेतलं नाही इतकं मानधन तिने घेतलं. ही रक्कम जवळपास 12 कोटींच्या घरात जाते. आजवर कोणाही अभिनेत्रीला इतकी रक्कम मिळालेली नाही. पण दीपिकाचं फेम आणि तिच्या कामाची पद्धत लक्षात घेऊन या चित्रपटात तिला साईन केलं गेलं. प्रभास आणि दीपिका ही पहिल्यांदाच चित्रपटाचा स्क्रीन शेअर करणार आहेत.

ही बाब ताजी असतानाच या सिनेमात अमिताभ बच्चन यांचीही एंट्री झाली. प्रभास आणि दीपिका या सिनेमात असताना बच्चन यात करणार काय असा प्रश्न अनेकांना पडला. त्यावर प्रभासपासून दीपिकापर्यंत सगळ्यांनी उत्तरं दिली. या सिनेमात प्रभासच्या भूमिकेच्या लांबी इतकीच अमिताभ यांच्या भूमिकेची लांबी आहे असं दीपिकाने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. सहाजिकच दुसरा प्रश्न रसिकांच्या मनात आला तो अमिताभ बच्चन यांच्या मानधनाचा. जर प्रभास आणि दीपिकाला इतकं भरमसाठ मानधन दिलं जातं तर अमिताभ बच्चन यांना दिलं जाणारं मानधन किती असेल असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर अमिताभ यांना मिळालेल्या मानधनाची चर्चा सध्या ऑनलाईन विश्वात सुरू झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी अश्विन नाग यांच्या सिनेमासाठी मानधन म्हणून घेतले आहेत तब्बल 21  कोटी रुपये. आता याला अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. पण ऑनलाईन विश्वात अशी चर्चा जोरावर आहे. अमिताभ यांनी आजवर घेतलेलं ही भरभक्कम मानधन असल्याचं कळतं. या सिनेमाचं बजेट 100 कोटी असल्याचं बोललं जातं. पण अमिताभ बच्चन, दीपिका आणि प्रभास यांच्या मानधनाची बेरीज केली तरी ती साधारण 50 कोटींच्या घरात जाते. या सिनेमात इतर कलाकारही आहेत. त्यामुळे या सिनेमाचं बजेटही तसंच वाढत जाईल असं म्हटलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan: मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
मोदी सरकारकडून देश सोडण्याचा आदेश, इम्रान खानचं मोठं पाऊल; थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव, प्रकरण नेमकं काय?
OM chapter 1: साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
साऊथ सिनेसृ्ष्टीत 'या' बिग बजेट सिनेमाची चर्चा; धनुष अन् ममूटी पहिल्यांदाच एकाच स्क्रीनवर, कधी होणार रिलीज?
Milind Gawali on Madhu Kambikar: 'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
'नृत्य करताना गिरकी घेतली अन्...'; मराठी अभिनेत्री मधु कांबीकरांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याची भावूक पोस्ट, सांगितली आठवण
Nana Patekar Condolence Meet Shivaji Satam: 'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्यां... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO
'नानाचे अनेक किस्से... शिव्या, मारामाऱ्या... क्रिकेट खेळाचो, पण एक नंबरचा रडी होता...'; नाना पाटेकरांच्या आठवणींत शिवाजी साटम गहिवरले, VIDEO

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
Embed widget