Vivek Agnihotri: प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींच्या घरात शिरलं दिवाळीचं रॉकेट; सोफा जळाला, आधी Video पोस्ट, नंतर डिलिट, सांगितलं कारण
Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्री यांनी आधी एका रॉकेटमुळे घरातील सोफ्याला आग लागली असल्याची पोस्ट केली होती. नंतर डिलिट केली.

Vivek Agnihotri Diwali: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) आपल्या पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी दिवाळीत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की, एका रॉकेटमुळे त्यांचा सोफा जळाला. त्यांचा हा सोफा बालकनीमध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान, सोफ्यावर असलेला कापड फायर - रेसिस्टेंट असल्यामुळे मोठी हानी टळली. किंवा सुदैवाने कोणती मोठी दुर्घटना झाली नाही. त्यांनी आपल्या पोस्टद्वारे अग्निसुरक्षा (Diwali Rocket Fire) नियमांची अधिक कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली. दरम्यान, काही वेळानंतर ही पोस्ट हटवली. विवेक अग्निहोत्री यांनी ही पोस्ट का डिलिट केली? यावर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर करुन स्पष्टीकरण दिलं आहे.
विवेक अग्निहोत्रींनी पोस्ट डिलिट का केली? (Vivek Agnihotri Deletes post About balcony sofa catched Fire)
विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया एक्स अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'काल रात्री, एक रॉकेट आमच्या बाल्कनीत आला होता. थेट येऊन सोफ्यावर पडला. नंतर आग लागली. आमच्या कुत्र्याने वेळीच आम्हाला सावध केले. सोफ्याचा कव्हर फायर रसिस्टेंड असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आम्हाला कायम हीच भीती होती की, अशी घटना घडू शकते. यावेळी आम्ही बचावलो, पण इतर पीडित लोकांचं काय? दिवाळी साजरी करायला, कुणाला आवडत नाही?', असं विवेक अग्निहोत्री आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.
'अशा प्रकारचे रॉकेट्स ही सांस्कृतिक अभिमानाची गोष्ट नाही. तर, आगीचा धोका आहे. आपली संस्कृती निष्पाप लोकांचे जीव धोक्यात घालण्याचे समर्थन करत नाही. मला आशा आहे की, प्रशासन मुंबईतील या आगीच्या घटनांची चौकशी करेल. जो कुणी कायद्याचे उल्लंघन करेल, तिथे त्या लोकांना जबाबदार धरले जाईल', असं विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं. सध्या त्यांच्या पोस्टची विशेष चर्चा होत आहे. त्यांनी पोस्टमध्ये जळालेल्या सोफ्याचेही फोटोस जोडले होते. दरम्यान, काही वेळानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ही पोस्ट डिलिट केली. यानंतर त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली.
'मी माझे पूर्वीचे ट्विट डिलिट करत आहे. कुणालाही दुखावण्याचा किंवा न कोणाच्याही सांस्कृतिक किंवा पर्यावरणीय विचांराना प्रोत्साहन देण्याचा, कमी लेखण्याचा माझा हेतू नाही. सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा', असं विवेक अग्निहोत्री म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:























