Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection Day 3 : कार्तिकच्या भूल भूलैय्या-2 ची बॉक्स ऑफिसवर जादू; तीन दिवसांमध्ये कोट्यवधींची कमाई
20 मे रोजी भूल भूलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection Day 3 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याच्या या चित्रपटाचं प्रेक्षक कौतुक करत आहेत. 20 मे रोजी भूल भूलैय्या-2 हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं वीकेंडला जबरदस्त कमाई केली आहे. रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटानं 14.11 कोटींची कमाई केली. आता शनिवारी (21 मे) आणि रविवारी (22 मे) देखील या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
भूल भूलैय्या-2 या चित्रपटानं आत्तापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. भूल भूलैय्या-2 नं शनिवारी (22 मे) या चित्रपटानं 18.34 कोटींची कमाई केली असून रविवारी म्हणजेच रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली.
भूलै भूलैय्या- 2 या चित्रपटानं यावर्षी रिलीज झालेल्या काही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड्स तोडले आहेत. आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचं तसेच बच्चन पांडे आणि द कश्मीर फाइल्स या चित्रपटांचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड देखील या चित्रपटानं तोडले आहे. हा हॉरर कॉमेडीवर आधारित असणारा हा चित्रपट प्रेक्षकांबरोबरच सेलिब्रिटींची देखील मनं जिंकत आहे. अभिनेत्री कंगना रनौत आणि सिद्धार्थ मल्होत्रा या कलाकारांनी या चित्रपटाचं कौतुक केलं होतं.
भूलै भूलैय्या- 2 हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या वालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. तर भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तर कियारा आडवाणीनं या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारली आहे. कियारानं या चित्रपटासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतलं आहे.