एक्स्प्लोर

Marathi Natak: 'पारू'च्या जोडीची आता पाकिस्तानात 'स्पायगिरी'! भरत दाभोळकरांचं अनोखं नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवणार

Vijay Patwardhan and Mugdha Karnik Reunite: भरत दाभोळकरांचा मराठी रंगभूमीवर पहिला प्रयोग. कॅरी ऑन स्पायगिरी, कॉमेडी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

Bharat Dabholkars Carry On SpyGiri: अनेक दशके, इंग्रजी, हिंदी तसेच गुजराती रंगभूमी गाजवणारे आणि अॅड गुरू भरत दाभोळकर (Bharat Dabholkar) आता एका नव्या इनिंगसाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ते मराठी प्रेक्षकांसाठी एक नवीन  सरप्राईज (Marathi Natak)  घेऊन येत आहे. कॅरी ऑन स्पायगिरी या नाटकातून ते प्रथमच मराठी रंगभूमीवर (Marathi Theatre) पाऊल ठेवत आहेत. भरत दाभोळकर यांनी आता आपल्या कारकि‍र्दीत लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा तिहेरी भूमिका साकारल्या आहेत. आता ते लवकरच  कॅरी ऑन स्पायगिरी या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज होणार आहेत. अभिनेते आकाश भडसावळे यांच्या ‘सवाईगंधर्व’ आणि ‘अभिजात’ या दोन संस्थांची ही निर्मिती असून, अभिनेता विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक यांची 'केमिस्ट्री' या नाटकातून आपल्याला अनुभवता येईल.

पारू मालिकेतील विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक प्रेक्षकांच्या भेटीला

झी मराठीवरील पारू या मालिकेमुळे विजय पटवर्धन आणि मुग्धा कर्णिक या जोडीला विशेष ओळख मिळाली. ही जोडी पुन्हा एकदा या नाटकाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.    या नाटताबाबत अभिनेते विजय पटवर्धन म्हणतात, "कॅरी ऑन SPYगिरी हे माझं 58 वं व्यावसायिक नाटक आहे. या नाटकातून मी आणि मुग्धा कर्णिक पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहोत. मुळात मुग्धा आणि माझी गट्टी 'घोळात घोळ' या नाटकापासून जमली होती. आम्हाला एकमेकांच्या कामाच्या पद्धतीची आणि 'टायमिंग'ची अचूक कल्पना आहे, त्यामुळे 'कॅरी ऑन SPYगिरी' मध्येही प्रेक्षकांना आमची तीच सहज केमिस्ट्री पाहायला मिळेल, यात शंका नाही. मालिका आणि नाटकात खूप फरक असतो. नाटकावेळी प्रेक्षक तुमच्या समोर असतो, त्याला दोन तास खिळवून ठेवणं ही कलाकाराची खरी कसब असते. आजच्या स्ट्रेसने भरलेल्या आयुष्यात विनोदी नाटक हा सर्वोत्तम विरंगुळा आहे. ‘कॅरी ऑन SPYगिरी’ नाटकात भरत सरांसोबत काम करण्याचा अनुभव उत्तम होता. त्यांच्या 'ब्लॅक ह्युमर'ची शैली प्रेक्षकांचा नक्कीच हशा वसूल करेल.

अभिनेत्री मुग्धा कर्णिक सांगते, "मराठी रंगभूमीला सध्या सुगीचे दिवस आले असून हे नाटक प्रेक्षकांना खळखळून हसवायला तयार आहे. 'पारू' या मालिकेमुळे गेल्या दोन वर्षांपासून विजय आणि मी एकत्र आहोत, ज्याचा फायदा नाटकाच्या तालमीतही होतो आहे. मात्र, मालिकेतली आमची पात्रं आणि या नाटकातली पात्रं एकमेकांच्या पूर्णपणे टोकाची आहेत. या नाटकाला दाभोळकरी 'पॅटर्न' मिळाल्यामुळे हे नाटक अजून खुलून निघालंय. भरत सरांची काम करण्याची पद्धत अत्यंत अभ्यासू असून त्यांच्या लिखाणातील 'राजकीय भाष्य' नाटकाला एक वेगळीच उंची देते. नाटकाच्या तालमींदरम्यान त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं."

'कॅरी ऑन SPYगिरी' नाटकात तगड्या कलाकारांची फौज

'कॅरी ऑन SPYगिरी' या नाटकात मोहन आझाद, विजय पटवर्धन, मुग्धा कर्णिक, राहुल पेठे, आकाश भडसावळे, सुयश पुरोहित, गीतांजली गणगे, गौरव निमकर आणि स्वतः भरत दाभोळकर अशा तगड्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. 10 एप्रिल रोजी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर, मुंबई येथे; तर 18 एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग होणार असल्याची माहिती आहे.  अस्सल 'दाभोळकरी' शैलीतील हे स्पाय-कॉमेडी नाटक मराठी रंगभूमीवर एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhaya Kadam On Hindi Bigg Boss: मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
मराठमोळ्या छाया कदम हिंदी बिग बॉसमध्ये झळकणार? म्हणाल्या, 'हिंदी बिग बॉसकडून ऑफर आलीय...'
Bollywood Actor Pradeep Rawat Struggle Stroy: 'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
'महाभारत'मुळे मिळाली ओळख, 'गजनी'मुळे बनले स्टार; 40 वर्षांची कारकीर्द अन् 100 हून अधिक सिनेमे; प्रदीप रावत यांचा अश्वत्थामापासून सुपरस्टार व्हिलनपर्यंतचा प्रवास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
आमीर खानसह 'गजनी', लगान गाजवला; दक्षिणात्य अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन, वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
Embed widget