Bailable Warrant Re-Issued Against Malaika Arora: मलायका अरोराच्या अडचणीत वाढ, मारहाणप्रकरणात कोर्टाकडून वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
Bailable Warrant Re-Issued Against Malaika Arora: अभिनेत्री मलायका अरोराच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मारहाण प्रकरणात मलायकाला कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे.

Bailable Warrant Re-Issued Against Malaika Arora: आपल्या क्लासी अदांसाठी आणि हटके फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी मलायका अरोराच्या (Malaika Arora) अडचणी वाढणार का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. मुंबईतील (Mumbai Court) एका न्यायालयानं 2012 मधील एका प्रकरणात अभिनेत्री मलायका अरोरा हिला वॉरंट जारी केलं आहे. मलायकाला धाडलेलं वॉरंट जामीनपात्र असल्याची माहिती मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2012 मध्ये सैफ अली खाननं केलेल्या मारहाण प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर न राहिल्याबद्दल मलायका अरोराविरुद्ध पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे.
मुंबईतील (Mumbai News) कुलाबा (Colaba) येथील रेस्टॉरंटमध्ये झालेल्या भांडणात बॉलिवूड अभिनेता सैफ अली खाननं (Saif Ali Khan) इक्बाल शर्मावर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यावेळी अमृता अरोरा लद्दाख ही मलायका अरोराची बहीण असून तिनं सैफ अली खानला मारहाण करताना पाहिल्याची साक्ष दिली होती. अभिनेता सैफ अली खान, अमृता अरोराचा मेहुणा शकील लडाक आणि बिलाल अमरोही यांच्याविरुद्ध 2012 मध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात साक्षीदार म्हणून हजर न राहिल्याबद्दल मॅजिस्ट्रेट कोर्टानं सोमवारी अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराविरुद्ध 5 हजार रुपयांचं जामीनपात्र वॉरंट पुन्हा जारी केलं आहे. दरम्यान, हे प्रकरण 29 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.
View this post on Instagram
प्रकरण नेमकं काय?
29 मार्च रोजी, मलायका अरोराची बहीण, अभिनेत्री अमृता अरोरा लदाख, हिनं तिसरी साक्षीदार म्हणून साक्ष दिली होती. तिनं आपील साक्ष नोंदवताना न्यायालयाला सांगितलेलं की, तिनं सैफ अली खानला त्याच माणसाला मारहाण करताना पाहिलं होतं, ज्यानं कुलाब्यातील एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील रेस्टॉरंटमध्ये आवाज केल्याबद्दल सैफ आणि त्याच्या मित्रांना आरडाओरडा आणि मोठमोठ्यानं आवाज केल्यामुळे फटकारलं होतं.
गेल्या वर्षी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. या प्रकरणातील साक्षीदारांमध्ये मलायका अरोराच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. कारण, ज्यावेळी घटना घडली, त्यावेळी मलायका सैफ आणि त्याच्या मित्रमंडळींसोबत उपस्थित होती. अमृता अरोरानं सांगितलं होतं की, सैफ अली खान, शकील लद्दाख, अमरोही, करीना कपूर खान, अभिनेत्री करिश्मा कपूर, मलायका, डिझायनर विक्रम फडणीस असे बरेच जण असल्यामुळे सर्वांनीच रेस्टॉरंटमध्ये जेवण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, कुलाबा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलाबा येथील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या भांडणामागील कथित कारण स्पष्ट करताना पोलिसांनी माहिती दिली होती की, ज्यावेळी सैफ अली खान आणि त्याच्यासोबत उपस्थित असलेली इतर मंडळी आरडाओरडा करत होती, त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या इक्बाल शर्मानं त्यांना रोखलं. त्यावेळी रागावलेल्या सैफ अली खाननं इक्बाल शर्माच्या नाकावर ठोसा मारला आणि त्याचे सासरे रमनभाई पटेल यांना धमकी दिली. सैफनं मारल्यामुळे इक्बाल शर्मा जखमी झाला होता, त्याच्या नाकाला दुखापत झाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























