एक्स्प्लोर

Atul Parchure death : 'तुझ्यासारखा पु.लं होणे नाही, ही गोष्ट सहन न होण्यासारखी', अतुल परचुरेंच्या जाण्याने सिनेसृष्टी हळहळी...

Atul Parchure death : अतुल परचुरेंच्या जाण्याने सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जातोय. सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त केली जातेय.

Atul Parchure death  : मराठी सिनेसृष्टीतला हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरेंच्या (Atul Parchure) एक्झिटमुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. अतुल परचुरे हे मागील वर्षभरापासून कर्करोगाशी झुंजत होते. त्यावर मात करत ते आता सुर्याची पिल्ले या नाटकातून रंगभूमीवर पुन्हा एकदा दमदार कमबॅकही करणार होते. पण त्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. अतुल परचुरेंच्या जाण्याने सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अभिनेते जयवंत वाडकर यांना एबीपी माझासोबत बोलताना अश्रू अनावर झाले. तसेच अशोक सराफ यांनाही या बातमीमुळे मोठा धक्का बसलाय. अतुल परचुरे यांनी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. त्यामुळे त्यांची प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या तितकीच भावते. 

ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही : अशोक सराफ

ही अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. एक चांगला अभिनेता मराठी सिनेसृष्टीने गमावला आहे. ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही. असं व्हायला नको होतं. फार छान नट, फार छान मुलगा होता. माझा अत्यंत जवळचा आणि आवडता मित्र होता. 

जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर

अभिनेते जयवंत वाडकर यांना ही बातमी ऐकून मोठा धक्का बसला. एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी म्हटलं की,सूर्याची पिल्ले नाटाकाची तालीम सुरु होती.. पाच दिवसांपूर्वी त्याला पुन्हा त्रास होत होता म्हणून अॅडमिट करण्यात आलं. पण तो पुन्हा येईल असं वाटलं होतं. यावर काय बोलावं हेच सुचत नाहीये. नववीत असल्यापासून आम्ही एकत्र काम करतोय. तेव्हापासूनची आमची मैत्री होती. आमचा मित्र खूप लवकर गेलाय.

तुझ्या सारखा पु.लं झाला नाही : वैभव मांगले

वैभव मांगले यांनी अतुल परचुरे यंच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हटलं की, अतुल मित्रा... मुंबईत आलो तेव्हा तू भेटलास... तू धीर देऊन म्हणालास स्वत:वर विश्वास ठेव आणि काम कर... तेव्हा पासून एक सहृदयता जपली होतीस माझ्या बाबतीत.. खूप प्रेम मिळालं तुझ्याकडून... तुझ्या सारखा पु.लं झाला नाही...

View this post on Instagram
 
A post shared by vaibhav mangale (@vaibhavmangale)

त्याला आम्ही कधीच विसरु शकणार नाही : सचिन पिळगांवकर

अतुल परचुरे सारखा कलाकार आणि मित्र गमवल्याचं दुख: खूपच त्रासदायक आहे त्याला आम्ही कधीच विसरू शकणार नाही, असं म्हणत सचिन पिळगांवकरांनी परचुरेंना श्रद्धांजली वाहिली आहे. 
 
ही बातमी वाचा : 

Atul Parchure Death : 'मला आता कसलंच सरप्राईज किंवा ट्रॉमा वाटणार नाही'; अतुल परचुरेंचा दुर्दम्य आशावाद, पण नियतीच्या मनात...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून वसुली करू नका, अन्यथा कारवाई होणार; नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना कडक आदेश
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून वसुली करू नका, अन्यथा कारवाई होणार; नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना कडक आदेश
परभणीत तरुणीवर सामूहिक अत्याचार, नराधमांना अटक; पालकमंत्र्यांचं आवाहन, ज्या ठिकाणी कुणी जात नाही-येत नाही, तिथं तरुण-तरुणींनी जाऊ नये
परभणीत तरुणीवर सामूहिक अत्याचार, नराधमांना अटक; पालकमंत्र्यांचं आवाहन, ज्या ठिकाणी कुणी जात नाही-येत नाही, तिथं तरुण-तरुणींनी जाऊ नये
Bihar election 2025 : बिहारमध्ये राजदची 'तेजस्वी' रणनीती, 36 विद्यमान आमदारांचा पत्ता कट; तेजप्रताप यादवांचीही जागा बदलली
बिहारमध्ये राजदची 'तेजस्वी' रणनीती, 36 विद्यमान आमदारांचा पत्ता कट; तेजप्रताप यादवांचीही जागा बदलली
टॅरिफ 'दादागिरी' करत सुटलेले ट्रम्प आता काय करणार? चीनचा अमेरिकेला आणखी एक तगडा झटका!
टॅरिफ 'दादागिरी' करत सुटलेले ट्रम्प आता काय करणार? चीनचा अमेरिकेला आणखी एक तगडा झटका!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmer Aid: 'मदत पोहोचली का?' Uddhav Thackeray विचारणार जाब, सरकारची धाकधूक वाढली!
Pune Politics: 'जी बाई वातावरण खराब करते तिचा राजीनामा भाजपने घेतला पाहिजे'; Thombre यांची मागणी
Political Fireworks: 'विरोधी पक्षात दम नाही, सगळेच लवंगी नेते', Rajesh Kshirsagar यांची टोलेबाजी
Amol Mitkari : ‘सोमय्या म्हणजे फुस्का बॉम्ब’, मिटकरींची राजकीय आतषबाजी
Shaniwarwada Row: 'शनिवारवाडा Medha Kulkarni यांच्या पप्पांचा नाही', Rupali Thombre Patil आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून वसुली करू नका, अन्यथा कारवाई होणार; नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना कडक आदेश
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय अनुदानातून वसुली करू नका, अन्यथा कारवाई होणार; नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना कडक आदेश
परभणीत तरुणीवर सामूहिक अत्याचार, नराधमांना अटक; पालकमंत्र्यांचं आवाहन, ज्या ठिकाणी कुणी जात नाही-येत नाही, तिथं तरुण-तरुणींनी जाऊ नये
परभणीत तरुणीवर सामूहिक अत्याचार, नराधमांना अटक; पालकमंत्र्यांचं आवाहन, ज्या ठिकाणी कुणी जात नाही-येत नाही, तिथं तरुण-तरुणींनी जाऊ नये
Bihar election 2025 : बिहारमध्ये राजदची 'तेजस्वी' रणनीती, 36 विद्यमान आमदारांचा पत्ता कट; तेजप्रताप यादवांचीही जागा बदलली
बिहारमध्ये राजदची 'तेजस्वी' रणनीती, 36 विद्यमान आमदारांचा पत्ता कट; तेजप्रताप यादवांचीही जागा बदलली
टॅरिफ 'दादागिरी' करत सुटलेले ट्रम्प आता काय करणार? चीनचा अमेरिकेला आणखी एक तगडा झटका!
टॅरिफ 'दादागिरी' करत सुटलेले ट्रम्प आता काय करणार? चीनचा अमेरिकेला आणखी एक तगडा झटका!
Gold Rate : सोनं 1 लाख 60 हजारांचा टप्पा पार करणार, चांदी सव्वा दोन लाखांवर पोहोचणार, तज्ज्ञांचा नवा अंदाज
सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, चांदी सव्वा दोन लाखांवर पोहोचणार, तज्ज्ञांचा नवा अंदाज
आर्मी जनरल की पोलिस महासंचालक? अधिकारांपासून ते पगारापर्यंत, कोण सर्वाधिक शक्तीशाली??
आर्मी जनरल की पोलिस महासंचालक? अधिकारांपासून ते पगारापर्यंत, कोण सर्वाधिक शक्तीशाली??
Donald Trump on India: रशियाकडून तेल खरेदी करणार नाही! मोदींनी शब्द दिल्याचा ट्रम्प यांचा दावा; पत्रकारांनी भारताने तुमची फोनाफोनी नाकारली म्हणताच म्हणाले..
रशियाकडून तेल खरेदी करणार नाही! मोदींनी शब्द दिल्याचा ट्रम्प यांचा दावा; पत्रकारांनी भारताने तुमची फोनाफोनी नाकारली म्हणताच म्हणाले..
Muhurat Trading 2025 : यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'या' वेळेत ट्रेडिंग सुरु असणार, जाणून घ्या वेळापत्रक
यंदा मुहूर्त ट्रेडिंगची वेळ बदलली, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 'या' वेळेत ट्रेडिंग सुरु असणार, जाणून घ्या वेळापत्रक
Embed widget