अशोक सराफ यांचे गुरु कोण? ऑडिशनची पद्धत अन् इन्स्टाग्राम फॉलोअर्सबाबतही रोख ठोक भाष्य
Ashok Saraf : अशोक सराफ यांचे गुरु कोण? ऑडिशनची पद्धत अन् इन्स्टाग्राम फॉलोअर्सबाबतही रोख ठोक भाष्य

Ashok Saraf : "हिंदी सिनेमात (Bollywood) प्रोफेशनलिझम जास्त आहे. आले काम केलं आणि निघून गेले. आपल्याकडे हास्यगप्पा होतात. एखादं घर असल्याप्रमाणे काम चालतं. त्यामुळे आपल्या घरामध्ये वावरायला आपल्याला केव्हाही आवडेल. प्रोफेशनल राहण्यापेक्षा तेच चांगलं आहे. हे माझं कर्तव्य म्हणून मी ठराविक बोलायचं आणि निघून जायचं आणि पैसे घ्यायचे. ते फक्त पैशासाठी काम करतात. ते कामासाठी काम नाही. मराठीत काम करण्यासाठी आनंद मिळतो", असं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) म्हणाले. ते एका मुलाखतीत बोलत होते.
अशोक सराफ म्हणाले, माझे मामा मराठी इंडस्ट्रीतील मोठे दिग्दर्शक होते. ते उत्कृष्ट अभिनेते देखील होते. ते माझे गुरु देखील आहेत. त्यांच्याकडून मी सगळं शिकलेलो आहे. त्यांचा सहभाग लाभल्यामुळे माझ्या अंगी देखील ते गुण आले. त्याकाळी इंडस्ट्रीची अवस्था वाईट होती. माणसाला फक्त त्यावर जगणं कठीण होतं. सिनेमा आणि नाटकांमधून त्याकाळी जास्त पैसे मिळत नव्हते. शहाण्या माणसाप्रमाणे कुठेतरी नोकरी करावी, तशीच माझ्या घरच्यांची देखील इच्छा होती. मी म्हटलं नाही, काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आपल्याला आवडतं तेच करायला पाहिजे. तरी देखील मी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीला लागलो होतो. तो सुद्धा आर्टिस्ट म्हणूनच लागलो होतो. मी म्हटलं ही नोकरी करायची आणि साईड वाईज बाकीचा बिझनेस करायचा. जर त्यात यश मिळालं तर सुरु ठेवायचा नाहीतर नोकरी करायची...तसाच माझा प्रवास सुरु झाला. मात्र, त्यानंतर चार वर्षात मी नोकरी सोडून दिली.
पुढे बोलताना अशोक सराफ म्हणाले, मी कधी ऑडिशन दिली नव्हती. आमच्यावेळी ऑडिशन ही पद्धत नव्हती. साधारणपणे हे चांगलं काम करतो म्हणून घेतलं जायचं. ऑडिशन घेतल्यामुळे सगळे यशस्वी झाले असंही नाहीये. कला आणि आर्टच्या बाबतीत ते कधीही संभव होऊ शकत नाही. चांगले दिसणारे देखील अपयशी झालेले आहेत. त्यामुळे ऑडिशनमुळे गोष्ट योग्य होतात, असं मी मानत नाही. तुम्हाला किती फॉलोवर्स आहेत, याच्यावरही यश मिळेल असं मी मानत नाही. कारण त्याचा ऑडियन्स वेगळा असतो. फेसबुक किती फॉलोवर्स आहेत, याचा सिनेमाला काय उपयोग होत नाही. सिनेमाचा एक वेगळाच ऑडियन्स आहे. किती फॉलोवर्स आहेत, यावर तुम्ही इकडे यशस्वी व्हाल, असं नाही. त्यामुळे मी पहिल्यापासून ऑडिशन नावाचा प्रकारच दिलेला नाही. कॅरेक्टर म्हणून मी फिट बसतो ना? मग खलास झालं.. आता हवालदाराचा रोल मिळाला तर मी हवालदार दिसतो. त्यामुळे मला तो रोल मिळाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या























