Aryan Khan Drugs Case: 'आर्यन खान कैदी नंबर-956'; कुटुंबाने तुरूंगात पाठवले 4500 रुपये
आर्यनला त्याचा कुंटुंबाने मनी ऑर्डरने 4500 रूपये पाठवले आहेत.
Aryan Khan Case: मुंबई ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानची चर्चा सगळीकडे चर्चा सुरू आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खान आणि गौरी खान सध्या आर्यनमुळे चिंतेत आहेत. आर्यनला आर्थर रोड येथील तुरूंगात ठेवण्यात आले आहे. त्याचा कैदी नंबर N956 आहे. आर्यनला 20 ऑक्टोबरपर्यंत तुरूंगात राहावे लागणार आहे. त्यानंतर त्याच्या जामीनावर निर्णय होणार आहे. काल त्याच्या जामीनाची सुनावणी पूर्व झाली. न्यायाधीशांनी 20 ऑक्टोबर पर्यंत निकाल राखून ठेवला आहे. आर्यन आणि अरबाज मर्जेंटसह इतर आरोपींना मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बरॅक नंबर एक मध्ये ठेवण्यात आले आहे. बरॅक नंबर एकचा वापर कोरोना काळात आयसोलेशन वॉर्ड म्हणून करण्यात येत होता. जेव्हा नवा कैदी येतो तेव्हा त्याला एक आठवडा आयसोलेशन वॉर्डमध्ये म्हणजेच बरॅक नंबर-1 मध्ये ठेवण्यात येते. एक आठवडा आयसोलेशन पूर्ण केल्यानंतर ड्रग्स प्रकरणातील आर्यन खान आणि त्याच्यासह अटकेत असलेल्या इतरांना कोरोना चाचणी करण्यात आली. 14 तारखेला आर्यन आणि इतर सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर आर्यनला इतर कैद्यांसोबत शिफ्ट करण्यात येणार होते. पण सुरक्षेच्या कारणामुळे ड्रग्स प्रकरणातील आरोपींसोबत आर्थर रोड येथील तुरूंगाच्या बरॅकमध्येच ठेवण्यात आले.
आर्यनच्या कुटुंबाने पाठवले 4500 रूपये
आर्यनला त्याचा कुंटुंबाने मनी ऑर्डरने 4500 रूपये पाठवले आहेत. 11 ऑक्टोबरला आर्यनसाठी कुटुंबाने हे पैसे पाठवले असून तुरूंगाच्या नियमानुसार कोणत्याही कैद्याला दर महिन्याला 4500 रूपयेच मनी ऑर्डरद्वारे पाठवता येतात. या मनी ऑर्डरचा वापर जेलच्या कॅंटीनमधझील विविध वस्तूंच्या खरेदीसाठी करता येतो. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान मनीऑर्डरमधून आलेल्या 4500 रुपयांचा वापर बिस्किटे आणि पाण्याची बॉटल घेण्यासाठी करत आहे.
Aryan Khan Drug Case: आर्यन खानची आजची रात्रही आर्थर रोड जेलमध्येच
शांत पण चिंताग्रस्त आहे आर्यन
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन तुरूंगामध्ये चिंताग्रस्त असतो. अनेक वेळ आर्यन शांत बसलेला असतो. तसेच आर्यनला तुरूंगाच्या आधिकाऱ्यांनी वाचण्यासाठी एक मासिक देखील दिले आहे.
आर्यन खान तुरुंगात असल्यापासून गौरी- शाहरुखची झोप उडाली
आर्यनच्या ड्रग्स प्रकरणाचा शाहरूखच्या डुप्लिकेटलाही फटका; काम मिळणे झाले अवघड