(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aryan Khan Cruise Drug Case : कैदी नंबर-956 शांत अन् अस्वस्थ! आर्थर रोड तुरुंगात आर्यनच्या 13 रात्री
Aryan Khan : मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा हिचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला. निकालाची प्रत मिळाल्यानंतर या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं जाणार आहे.
Aryan Khan Cruise Drug Case : मुंबई ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा हिचा जामीन अर्ज आज, बुधवारी न्यायालयाने फेटाळला. निकालाची प्रत मिळाल्यानंतर हायकोर्टात आव्हान दिलं जाणार आहे. दोन ऑक्टोबर रोजी आर्यनला एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. चार दिवसाच्या एनसीबी कोठडीनंतर 8 तारखेला आर्यनची रवानगी आर्थर रोड तुरुगांत झाली होती. मागील 13 दिवसांपासून आर्यन आर्थर रोड तुरुंगात ठेवलं. त्याचा कैदी नंबर-956 असा आहे. श्रीमंतीत राहणाऱ्या आर्यननं आर्थर रोड तुरुगांत 13 रात्री घालवल्या आहेत. यावेळी तो शांत, चिंताग्रस्त आणि अस्वस्थ होता. आर्यन तुरुगांत असल्यामुळे शाहरुखसह कुटुंबासाठीही हा काळ कठीण असेल.
आर्थर रोड तुरुंगातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थर रोड तुरूंगामध्ये आर्यन सतत चिंताग्रस्त असतो. अनेक वेळ आर्यन शांत आणि अस्वस्थ बसलेला असतो. आर्यनला तुरूंगातील आधिकाऱ्यांकडून वाचण्यासाठी मासिकही देण्यात आलं. आर्यन खानला इतर कैद्याप्रमाणेच ब्लँकेट आणि एक चादर देण्यात आली आहे. आर्यनसह इतर अन्य कैद्यांना घरातून पाठवलेले कपडे वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, बाहेरुन अथवा घरातून पाठवलेल्यावर जेवणावर बंदी आहे. त्यामुळे आर्यनला आर्थर रोड तुरुंगातील इतर कैद्याप्रमाणे जेवणं करावं लागलं.
आर्यनला मनी ऑर्डर मार्फत 4500 रूपये मिळाले आहेत. त्यामधून तो तुरुंगातील कँटीनमधून कूपनद्वारे खाण्याच्या वस्तू, साबणसह इतर दररोज लागणाऱ्या गोष्टी खरेदी करतो. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खान याने कँटीनमधून बिस्किट, नमकीन, ड्राय फ्र्यूट्स, फ्रूट्स आणि पाण्याची बॉटलसारख्या गोष्टी खरेदी करत आहे. सुरुवातीच्या काळात स्नॅक्स आणि ड्राय फ्रूट्स खालल्यानंतर आता आर्यन तुरुंगातील जेवण खात आहे.
आर्यनच्या कुटुंबाने पाठवले 4500 रूपये
11 ऑक्टोबर रोजी आर्यनसाठी कुटुंबाने 450 रुपयांची मनी ऑर्डर पाठवली होती. तुरूंगाच्या नियमानुसार कोणत्याही कैद्याला दर महिन्याला 4500 रूपयांचीच मनी ऑर्डर पाठवता येते. या मनी ऑर्डरचा वापर तुरुंगातील कँटीनमधील विविध वस्तूंच्या खरेदीसाठी करता येतो.
शांत आणि अस्वस्थ आर्यन -
आर्यन तुरूंगामध्ये शांत, अस्वस्थ आणि चिंताग्रस्त असतो. बराकीजवळून कुणी गेलं तरी त्याला काही सूचना कुणी घेऊन आल्यासारखं वाटतं. स्टारकीड असल्यामुळे आर्यनची सुरक्षाही महत्वाची आहे. त्यामुळे आधिकारी बराकीकडे ये-जा करत असतात. आर्यन अनेकदा या अधिकाऱ्यांना कुणी भेटायला आलेय का? असा प्रश्न विचारत असतो.
कसा राहीला संपूर्ण घटनाक्रम -
- 2 ऑक्टोबरच्या शनिवारी मुंबई क्रुझ टर्मिनलवर धाड
- 3 ऑक्टोबरला रविवारी आर्यनला अटक आणि सुट्टिकालीन कोर्टाकडनं पहिली रिमांड 4 ऑक्टोबरपर्यंत
- 4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एनसीबीला नियमित कोर्टाकडनं मिळाली 7 ऑक्टोबरपर्यंत रिमांड
- 7 ऑक्टोबरला मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टानं आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली
- आर्यनखानची रवानगी आर्थर रोड कारागृहात, कोरोनाकाळामुळे नियमाप्रमाणे आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात ठेवलं
- न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनच्या जामिनाची याचिका सादर करण्यात आली
- 8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीनं त्यावर आक्षेप घेतला
- मुख्य महानगदंडाधिकारी कोर्टाच्या कार्यक्षेबाहेरील हे प्रकरण असल्याचा एनसीबीचा दावा मान्य, जामीन फेटाळला
- 9-10 ऑक्टोबर शनिवार रविवार असल्यानं कोर्ट बंद
- 11 ऑक्टोबरला सोमवारी जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर
- एनसीबीनं अपेक्षेप्रमाणे उत्तर देण्यासाठी मागितला आठवड्याचा अवधी, मात्र बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाकडून निर्देश
- 12 ऑक्टोबर कोर्टात काहीही कारवाई नाही
- 13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी, एनसीबीचा जोरदार विरोध
- समाजातील प्रतिष्ठा पाहता तो बाहेर आल्यास तपासावर परिणाम होऊ शकतो. तसेच आपलं वजन वापरून त्याच्यावतीनं पुराव्यांशी छेडछाड आणि अन्य साक्षीदारांवर दबावही आणला जाऊ शकतो. असा दावा करत एनसीबीनं बुधवारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला.
- आरोपीकडे अमली पदार्थ सापडोत अथवा न सापडोत, एनडीपीएस कायद्यातील कलम 29 नुसार अश्या कटात सामील असणं हा एक गंभीर गुन्हा आहे. तुमच्याकडे ड्रग्ज नाही जरी सापडले तरी जेव्हा एनडीपीएस कायद्यातील कलम 29 लावलं जातं तेव्हा आरोपी मुख्य सुत्रधाराइतकाच दोषी असतो असं एनसीबीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी कोर्टाला सांगितलं.
- 14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीश वी.वी. पाटील यांनी निकाल राखून ठेवला
- 15 ते 19 ऑक्टोबर कोर्ट सणासुदीच्यानित्तानं बंद असल्यामुळे निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत जाहीर करण्याचा प्रयत्न करू - कोर्ट
- 20 ऑक्टोबर कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला