एक्स्प्लोर

Ashram 3 : आश्रम-3 मधील बोल्ड सीनबाबत अनुरिता झानं विचारलं वडिलांना; बिंधास्त उत्तर देत वडील म्हणाले...

बॉबी देओलसोबतच अभिनेत्री अनुरिता झा (Anurita Jha) देखील या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Ashram 3 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओलचा (Bobby Deol) चाहता वर्ग मोठा आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. बॉबीच्या आश्रम (Aashram 3) या वेब सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर या सीरिजचे दोन सिझन रिलीज झाले. आता या सीरिजचा तिसरा भाग हा उद्या (3 जून) रिलीज होणार आहे. सध्या या सीरिजची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. बॉबी देओलसोबतच अभिनेत्री अनुरिता झा (Anurita Jha) देखील या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. अनुरितानं एका मुलाखतीमध्ये या सीरिजमधील बोल्ड सिनबाबत सांगितलं. 
 
एका मुलाखतीमध्ये अनुरिता म्हणाली, 'मी माझ्या कुटुंबाला आधीच या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामुळे मी उत्सुक होते. पहिल्यांदाच मी इंटिमेट सीन शूट केला. मी माझ्या करिअरमध्ये असा सीन कधीच केला नव्हता. बोल्ड सीन शूट करण्याआधी मी माझ्या वडिलांना फोन केला होता. त्यांना मी म्हणाले की, मी हे करु की नको? यावर माझ्या वडिलांनी उत्तर दिलं. हो, बिंधास्त कर. त्यामुळे मी हा सीन शूट केला.    '

अनुरिता ही 'आश्रम 3' मध्ये कविता या भूमिकेत दिसणार आहे. MX Player वर  ही सीरिज रिलीज होणार आहे. ड्रग्स, गुंड आणि राजकारण या सर्व गोष्टींवर आधारित असलेल्या आश्रम सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये नक्की काय दाखवले जाईल? याबाबत सध्या प्रेक्षक विचार करत आहेत. त्रिधा चौधरी, अदिती सुधीर पोहनकर आणि तुषार पांडे यांनी आश्रम सीरिजमध्ये काम केलं आहे. 

बॉबीनं शेअर केला होता मोशन पोस्टर 
काही दिवसांपूर्वी बॉबीनं या सीरिजचा मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला होता. या पोस्टरमध्ये तीन लिहिलेलं दिसत आहे.  बॉबी देओलसोबतच  ईशा गुप्तानं देखील हा मोशन पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला.  आश्रम या सीरिजच्या पहिल्या दोन सिझनमध्ये अभिनेता बॉबी देओलनं बाबा निराला ही भूमिका साकारली आहे. काशीपूर येथील एका काल्पनिक कथेवर या सीरिजचं कथानक आधारित आहे. 
 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Isha Koppikar On PM Modi: 'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
'मी अंधभक्तच आहे, करा अनफॉलो..' पंतप्रधान मोंदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर अभिनेत्री संतापली; म्हणाली ..
Viraj Japtap on Maharashtrachi HasyaJatra: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याला सचिन गोस्वामींकडून ओरडा, जुना किस्सा; म्हणाले, 'बॅग घेऊन घरी जायचं, परत यायचं नाही'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget