Fakira Cinema :  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या 'फकिरा' (Fakira) या कादंबरीला 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा मिळाला होता.  या कादंबरीला वि.स. खांडेकरांची प्रस्तावना आहे. दरम्यान अण्णाभाऊ साठेंच्या याच कादंबरीची गोष्ट आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित फकिरा हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


या सिनेमाचं पोस्टर नुकतच लॉन्च करण्यात आलं. अण्णाभाऊ साठेंच्या या कादंबरीत  फकिरा नावाच्या तरुणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी अशी ही कादंबरी आहे. दरम्यान या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सध्या प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 


चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार


या चित्रपटात नाना पाटेकर, सयाजी शिंदे, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, मकरंद देशपांडे, नागेश भोसले, संदीप पाठक, कमलेश सावंत, किरण माने हे कलाकार दिसणार आहे. रुद्र ग्रुप आणि चित्राक्षी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटाची पटकथा आणि संवाद मंदार जोशी आणि भाऊराव कऱ्हाडे यांनी लिहिले आहेत. पण या चित्रपटासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे. कारण हा सिनेमा पुढच्या वर्षात म्हणजेच 2025मध्ये प्रदर्शित होणार आहे. 






अण्णाभाऊ साठेंच्या फकिरा कादंबरीत काय?


फकिरा नावाच्या तरुणाची गोष्ट आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा या कादंबरीत आहे. अण्ण भाऊ साठे यांच्या इतर कादंबऱ्यांप्रमाणेच, संघर्ष हा फकिरा या कादंबरीचा मध्यवर्ती विषय आहे. फकिराचे बंड सामाजिक न्यायाची आणि स्वातंत्र्याची प्रेरणा घेऊन येत असल्यामुळे त्याचे जगणे त्याचा संघर्ष हा व्यवस्था परिवर्तनाचा इतिहास ठरणार आहे .अण्णाभाऊंच्या या फकीरा कादंबरी मध्ये नैतिकतेचे वेगळेच अधिष्ठान आपल्याला पाहायला मिळते. "फकीरा ही कादंबरी अनेक दृष्टींनी महत्त्वाची आहे .ग्रामीण, प्रादेशिक, दलित ,ऐतिहासिक कादंबरी म्हणून जशी ती महत्त्वाची आहे तशी ती एक उपेक्षित नायकाचे बंडखोर जीवन समाजासमोर आणणारी कादंबरी म्हणूनही महत्त्वाची आहे, असं अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे. 


ही बातमी वाचा : 


Marathi Movie :  आणखी एक नाटक रुपेरी पडद्यावर; "अलबत्या गलबत्या" आता थ्रीडीमध्ये झळकणार